मुंबई, 21 डिसेंबर: राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रडून असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केलं आहेत. पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळे या चाचणीमध्ये मार्किंग पॅटर्न नक्की कसं असेल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
अशी असेल शारीरिक चाचणी
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.
MIDC Recruitment: थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या सरकारी नोकरी; तुम्ही आहात का पात्र? मग करा अप्लाय
गोळाफेक (पुरुष : 7.260 किलोचा गोळा)
गोळाफेक (पुरुष : 7.260 किलोचा गोळा) | मिळणारे मार्क्स |
8.50 मीटर किंवा त्यापेक्षा कमी | 15 गुण |
7.90 मीटर ते 8.50 मीटर | 12 गुण |
7.30 मीटर ते 7.90 मीटर | 10 गुण |
6.70 मीटर ते 7.30 मीटर | 08 गुण |
6.10 ते 6.70 मीटर | 06 गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण |
कमीतकमी 3.10 मीटर ते 3.70 मीटरपर्यंत | एक गुण |
गोळाफेक (महिला : 4 किलोचा गोळा)
गोळाफेक (महिला : 4 किलोचा गोळा) | मिळणारे मार्क्स |
6 मीटर किंवा त्यापेक्षा कमी | 15 गुण |
5.50 ते 6 मीटर | 12 गुण |
5 ते 5.50 मीटर | 10 गुण |
4.50 ते 5 मीटर | 5 गुण |
4 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण 4.50 मीटरपेक्षा कमी | 3 गुण |
4 मीटरपेक्षा कमी | गुण नाही |
ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात जॉबची सर्वात मोठी संधी; या कंपनीत ऑफ कॅम्पस ड्राइव्हची घोषणा; थेट मुलाखत
100 मीटर धावणे (पुरुष)
100 मीटर धावणे (पुरुष) | मिळणारे मार्क्स |
11.50 सेकंद | 15 गुण |
11.50 सेकंदापेक्षा जास्त व 12.50 सेकंदापेक्षा कमी | 12 गुण |
12.50 सेकंद व 13.50 सेकंदापेक्षा कमी | 10 गुण |
13.50 सेकंद ते 14.50 सेकंद | 8 गुण |
14.50 ते 15.50 सेकंद | 6 गुण |
15.50 ते 16.50 सेकंद | 4 गुण |
16.50 ते 17.50 गुण | 1 गुण |
100 मीटर धावणे (महिला)
100 मीटर धावणे (महिला) | मिळणारे मार्क्स |
14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 15 गुण |
14 ते 15 सेकंद | 12 गुण |
15 ते 16 सेकंद | 10 गुण |
16 ते 17 सेकंद | 8 गुण |
17 ते 18 सेकंद | 6 गुण |
18 ते 19 सेकंद | 4 गुण |
19 ते 20 सेकंद वेळ लागल्यास | एक गुण |
800 मीटर धावणे (महिला)
800 मीटर धावणे (महिला) | मिळणारे मार्क्स |
2 मिनिटे 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी | 20 गुण |
2 मिनिटे 50 सेकंद ते 3 मिनिटे | 18 गुण |
3 मिनिटे ते 3 मिनिटे 10 सेकंद | 16 गुण |
3 मिनिटे 10 सेकंद ते 3 मिनिटे 20 सेकंद | 14 गुण |
3.20 ते 3.30 मिनिटे | 12 गुण |
3.30 ते 3.40 मिनिटे | 10 गुण |
3.40 मिनिटे ते 3.50 मिनिटे | 8 गुण |
3.50 मिनिटे ते 4 मिनिटे | 5 गुण |
ही सुवर्णसंधी सोडूच नका! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरी; 80,000 रुपये मिळेल पगार
1600 मीटर धावणे (पुरुष)
1600 मीटर धावणे (पुरुष) | मिळणारे मार्क्स |
5,10 मिनिटे | 20 गुण |
5.10 ते 5.30 मिनिटे | 18 गुण |
5.30 ते 5.50 मिनिटे | 16 गुण |
5.50 मिनिटे ते 6.10 मिनिटे | 14 गुण |
6.10 ते 6.30 मिनिटे | 12 गुण |
6.30 ते 6.50 मिनिटे | 10 गुण |
6.50 ते 7.10 | 8 गुण |
7.10 ते 7.30 मिनिटे | 5 गुण |
ठरलेले अंतर धावू न शकल्यास | शून्य गुण |
अशा पद्धतीनं शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारांना गुण दिले जाणार आहेत. तरी उमेदवारांनी यानुसार सराव करत राहणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Maharashtra police