मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थ्यांनो महत्त्वाची बातमी! बारावी परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये बदल; 'हे' 2 पेपर्स ढकलले पुढे

विद्यार्थ्यांनो महत्त्वाची बातमी! बारावी परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये बदल; 'हे' 2 पेपर्स ढकलले पुढे

बारावीच्या टाइम टेबलमध्ये बदल

बारावीच्या टाइम टेबलमध्ये बदल

23 फेब्रुवारीला घडलेल्या एका घटनेमुळे बारावीच्या टाइम टेबलमध्ये बदल (Changes in MH Board 12th Time table) करण्यात आला आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 24 फेब्रुवारी: कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन (Online Education) पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन परीक्षांना (Offline Exams of 10th and 12th) विद्यार्थी विरोध करत आहेत. तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच (Board Exams of Maharashtra state Board) होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रकही (10th 12th Board exam Time table) जाहीर करण्यात आलं आहे. मात्र 23 फेब्रुवारीला घडलेल्या एका घटनेमुळे बारावीच्या टाइम टेबलमध्ये बदल (Changes in MH Board 12th Time table) करण्यात आला आहे. 23 फेब्रुवारीला प्रश्न पत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे सर्व प्रस्ग्नपत्रिका जाळून खाक झाल्या होत्या. या टेम्पोमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका होत्या. म्हणूनच आता बारावीच्या टाइम टेबलमध्ये बदल करत काही पेपर्स पुढे ढकलण्यात आले आहेत. खासगी शाळेत शिकून मुलं हुशार होतील असं अजिबात नाही; एका संशोधनाचा निष्कर्ष बारावी परीक्षेचे 5 आणि 7 मार्च रोजी होणारे पेपर्स हे आता 5 आणि 7 एप्रिल रोजी होणार आहेत. म्हणजेच सुरुवातीचे दोन पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. 5 मार्च रोजी होणारा हिंदी चा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे. तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर हा 7 एप्रिलला घेणार येणार आहे. परीक्षा तोंडावर आली असताना हे बदल करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. मात्र प्रश्नपत्रिका नसल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत. हे बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि परीक्षेला उपस्थित राहावं असं आवाहन शालेय शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे. तसंच हे बदल केवळ तारखेत असणार आहेत परीक्षेचा अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे हेही स्पष्ट करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनो, 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच; सुप्रीम कोर्टानं फेटाळली याचिका प्रॅक्टिकल्सचं असेल असं नियोजन इयत्ता बारावीसाठी किमान 40 टक्के प्रात्यक्षिकावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग/ गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे. तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन व तत्सम मूल्यमापनात मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्यात येत आहे. इयत्ता बारावी व इयत्ता दहावी परीक्षेच्या प्रात्यक्षिक/ तोंडी/ अंतर्गत मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व व परीक्षोत्तर संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांबाबत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ परीक्षा केंद्र/ परिरक्षक व संबंधित घटकांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.
First published:

Tags: Board Exam, Career, Exam timetable, HSC, Maharashtra

पुढील बातम्या