मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

पालकांनो, खासगी शाळेत शिकून मुलं हुशार होतील असं अजिबात नाही; एका संशोधनाचा धक्कादायक निष्कर्ष

पालकांनो, खासगी शाळेत शिकून मुलं हुशार होतील असं अजिबात नाही; एका संशोधनाचा धक्कादायक निष्कर्ष

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

खासगी शाळेत शिकल्यानं आपलं मुल हुशार होईल, त्याचं भविष्य उज्ज्वल होईल असा पालकांचा दृढ विश्वास असतो. मात्र पालकांच्या या गृहितकाला जोरदार धक्का देणारा एक निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून (Research)पुढं आला आहे.

मुंबई , 24 फेब्रुवारी:  सर्वसाधारणपणे मूल अडीच-तीन वर्षांचं झाले की पालकांना (Parents) त्याच्या शाळेची (School) काळजी लागते. उत्तम शाळेचा शोध सुरू होतो आणि बहुतांश पालक भरभक्कम शुल्क भरून एखाद्या खासगी शाळेची (Private School) निवड करतात. फार कमी पालक सरकारी शाळेत आपल्या मुलांना पाठवण्याचा निर्णय घेतात. खासगी शाळेत शिकल्यानं आपलं मुल हुशार होईल, त्याचं भविष्य उज्ज्वल होईल असा पालकांचा दृढ विश्वास असतो. मात्र पालकांच्या या गृहितकाला जोरदार धक्का देणारा एक निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून (Research)पुढं आला आहे. खासगी शाळा मुलांना सर्वोत्तम शिक्षण देतील आणि त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी अधिक सक्षम करतील. हे गृहितक ग्राह्य मानलं जावं असा कोणताही निर्णायक पुरावा नसल्याचं या संशोधनात म्हटलं आहे. टीव्ही9 नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

न्यू इंग्लंड विद्यापीठातून (New England University) शिक्षण आणि मानसशास्त्रात पीएचडी करत असलेल्या सॅली लार्सन आणि अलेक्झांडर फोर्ब्स यांनी याबाबत संशोधन केलं असून, हा संशोधन अहवाल द कॉन्व्हर्सेशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अन्य काही देशांमध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) नर्सरीपासून चौथीपर्यंतची 30 टक्के मुलं आणि पाचवी ते आठवीपर्यंतची 40 टक्के मुले खासगी शाळांमध्ये शिकतात. खासगी शाळांचे शुल्कही त्या चालविणाऱ्या संस्थांनुसार वेगवेगळे असते. मात्र इथे सर्व शाळांना कमी जास्त प्रमाणात सरकारी अनुदान मिळतं.

HPE CodeWars 2022: विद्यार्थ्यांनो, Coding करा आणि जिंका तब्बल 3 लाखांचं बक्षीस

या संशोधकांनी ऑस्ट्रेलियातील शाळांमधील मुलं आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुलांचा अभ्यास केला असता असं दिसून आलं की, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीनुसार खासगी शाळांमध्ये शिकणारी मुले सार्वजनिक शाळांमधील मुलांपेक्षा वेगळी नाहीत. एनएपीएलएएनमधील (NAPLAN) त्यांच्या स्कोअरमध्ये फार फरक नाही. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे खासगी शाळेत जाण्याची शक्यता आणि शैक्षणिक सुविधांची उपलब्धता या दोन्हीशी संबंधित आहे.

खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीमध्ये फरक दिसून येत असला तरी, मुलाची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी विचारात घेतल्यावर हा फरक फार ढोबळ असल्याचं जाणवतं. 2018मधील प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल असेसमेंट (PISA) चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या 68 शिक्षण प्रणालींचे विश्लेषण केल्यानंतर खासगी शाळांमध्ये शिकणे नेहमीच उत्तम नसते असं सिद्ध झालं असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे.

ओईसीडी (OECD) देशांमध्ये आणि 40 शिक्षण व्यवस्थामध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात, खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी सार्वजनिक शाळांमधील मुलांपेक्षा जास्त वाचन गुण मिळवले आहेत. त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थिती गृहीत न धरता हे मूल्यांकन करण्यात आलं आहे. विद्यार्थी आणि शाळेची सामाजिक आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊन करण्यात आलेल्या मुल्यांकनानुसार, सार्वजनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे गुण खासगी शाळांच्या मुलांपेक्षा जास्त असल्याचं स्पष्ट झालं. ऑस्ट्रेलियात खासगी शाळांना अधिक पाठिंबा दिला जात असून, त्यासाठी या शाळांमध्ये मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळत असल्याचा युक्तिवाद केला जातो. म्हणजेच खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा वेग सरकारी शाळेतील मुलांपेक्षा चांगला आहे, असं गृहीत धरलं जातं. शाळेच्या प्रकारानुसार चार एनएपीएलएएन चाचणी वर्षांमध्ये (3, 5, 7 आणि 9वर्षे वयात) विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीत फरक पडतो का हे तपासणारे हे पहिले संशोधन आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.

आम्ही सार्वजनिक शाळा, खासगी शाळा तसंच तिसऱ्या आणि पाचव्या वर्षात सार्वजनिक शाळेत आणि नंतर सातव्या आणि नवव्या वर्षी खासगी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या एनएपीएलएएन स्कोअरची तुलना केली. नंतरच्या गटातील विद्यार्थ्यांनी चार चाचणी वर्षांमध्ये संख्यात्मक चाचण्या आणि वाचनात सर्वाधिक गुण मिळवले. या गटाने सर्व वर्षांमध्ये खासगी शाळांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा आणि सर्व वर्षांमध्ये सार्वजनिक शाळांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगले प्रदर्शन केले. परंतु खासगी शाळेत जाण्यानं विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता वाढते असा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांनो, पहाटे अभ्यास करताना डोळे लागतात? मग या टिप्समुळे येणार नाही झोप

हे उच्च कामगिरी करणारे विद्यार्थी खासगी शाळेत जाण्यापूर्वी सार्वजनिक शाळेत सर्वाधिक गुण मिळवत होते. त्यांना खासगी शाळांमध्ये पाठवल्याने त्यांच्या एनएपीएलएएन स्कोअरवर परिणाम झाला नाही. सार्वजनिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमधील त्यांच्या समवयस्क विद्यार्थ्यांइतकीच प्रगती केली. यामुळं खासगी शाळेत विद्यार्थ्यांचा उत्तम शैक्षणिक विकास होतो, हा दावा फोल ठरतो, असा निष्कर्ष या संशोधकांनी नोंदवला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांमध्ये करण्यात आलेलं हे संशोधन परवडत नसताना आवाक्याबाहेरील शुल्क भरून आपल्या पाल्यांना महागड्या खासगी शाळांमध्ये घालणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

First published:

Tags: Career, Exam, School, School children