मुंबई, 23 फेब्रुवारी: कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन (Online Education) पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन परीक्षांना (Offline Exams of 10th and 12th) विद्यार्थी विरोध करत आहेत. तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच (Board Exams of Maharashtra state Board) होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र CBSE, CISE आणि स्टेट बोर्डाच्या ऑफलाईन (MH state board Exams) परीक्षांना आवाहन देणारी एक याचिका (Petition against offline board exams) सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टन फेटाळली (SC refused petition against board exams) आहे आणि याचिकाकर्त्यांना कडक शब्दात सुनावलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्यभरातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षांच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला हिंदुस्थानी भाऊसारख्या सेलिब्रिटींनी समर्थन दिलं होतं. तसंच वकील आणि बाल हक्क कार्यकर्ते अनुभा सहाय श्रीवास्तव यांनी ऑनलाईन परीक्षांच्या विरोधात एक याचिकाही सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. याच याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. मात्र हे याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. विद्यार्थ्यांनो, पहाटे अभ्यास करताना डोळे लागतात? मग या टिप्समुळे येणार नाही झोप काय होती याचिका CBSE, ICSE आणि स्टेट बोर्डानं विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा न घेता गेल्यावेळी प्रमाणे मूल्यमापनाच्या पद्धतीचा वापर करावा आणि निकाल त्या पद्धतीनं जाहीर करण्यात यावा असे आदेश कोर्टानं शिक्षण मंडळांना द्यावेत अशी याचिका करण्यात आली होती. मात्र यावर सुपुईम कोर्टानं याचिकाकर्त्यांना चांगलंच सुनावलं आहे. काय म्हणाले सुप्रीम कोर्ट " परीक्षांबाबत योग्य तो निर्णय फक्त प्रशासनाला घेऊ द्या. अशा याचिका फक्त विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्यासाठी असतात. मुळात या याचिकला प्रसिद्धी दिली कोणी? यामुळे विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होते. यानंतर अशाप्रकारच्या याचिका दाखल करू नका." अशा खड्या शब्दांमध्ये न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठानं याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. Vastu Tips: मुलांच्या खोलीतून आताच बाहेर काढा ‘या’ गोष्टी; परीक्षेत करतील टॉप विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता दहावी आणि बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता बोर्डाच्या परीक्षांची तारीख जवळ येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षांची तयारी करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.