मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Maharashtra Board Exam : SSC, HSC परीक्षेदरम्यान कोरोना झाला तर अशा विद्यार्थ्यांचं काय?

Maharashtra Board Exam : SSC, HSC परीक्षेदरम्यान कोरोना झाला तर अशा विद्यार्थ्यांचं काय?

Maharashtra Board Exam : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th Exam) ठरलेल्या वेळेतच आणि ऑफलाईन होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

Maharashtra Board Exam : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th Exam) ठरलेल्या वेळेतच आणि ऑफलाईन होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

Maharashtra Board Exam : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th Exam) ठरलेल्या वेळेतच आणि ऑफलाईन होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 09 एप्रिल : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Exam) परीक्षांचं काय होणार याचीच प्रतीक्षा सर्वांना होती. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चाही सुरू होती पण आता या परीक्षा ठरलेल्या वेळेतच (Maharashtra Board Exam) होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांकडून हा प्रश्न विचारला जात आहे की दहावी (SSC exam), बारावीची परीक्षा (HSC exam) ऑफलाइन होणार की ऑनलाइन? आता या परीक्षा ऑफलाइन  होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. दहावीची परीक्षा 29 एप्रिल आणि  बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासूनच सुरू होणार. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 16 लाख तर बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थी बसणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षासाठी यंत्रणा उभी करणं सहज शक्य नाही आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचा - MPSC नंतर दहावी-बारावी परीक्षाही पुढे ढकलणार का? पाहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री दरम्यान परीक्षेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिअल परीक्षा होणार नाही. प्रॅक्टिकल टेस्ट आंतर मूल्यांकन चाचणीत बदलण्या आली आहे. विद्यार्थ्यांना असाइनमेंट दिली जाईल, या असाइनमेंट थिएरी परीक्षेनंतर म्हणजे  21 मे ते 10 जूनपर्यंत सबमिट कराव्या लागतील. तर बारावीच्या फक्त महत्त्वाच्या अशा पाच ते सहा प्रॅक्टिअल परीक्षा होतील. ही परीक्षा 22 मे ते 10 जून असेल. कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी किंवा त्याच्या कुटुंबातील कुणाला कोरोना झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला असाइनमेंट सबमिट करण्यासाठी जास्तीचे 15 दिवस दिले जातील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षेच्या काही दिवल आधीच किंवा परीक्षेदरम्यान विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्यांचं काय होणार? तर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. थिएरी आणि प्रॅक्टिअल दोन्ही परीक्षा झाल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये या परीक्षा होतील. ठरलेल्या परीक्षा केंद्रावरच या परीक्षा असतील. हे वाचा - खळबळजनक! आणखी एक रुग्णालय कोरोनाच्या विळख्यात; लस घेतलेले 35 डॉक्टर पॉझिटिव्ह राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबतदेखील प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे. राज्यभरातून अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मेसेज येत आहेत. कोरोना आणि परीक्षा या दोन्ही मुद्द्यांवर या मॅसेजेसमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मुलांचे करिअर आणि त्यांचे जीवन या दोन्हीलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचं ट्वीट  आदित्य ठाकरेंनी केलं आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षांबाबत आमदारांशी चर्चा करत आहेत. सर्वपक्षीय नेते, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे, असं स्पष्ट करत काही दिवसातच निर्णय कळवू, असंही शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे
First published:

Tags: Exam, HSC

पुढील बातम्या