राज्यभरातून अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मेसेज येत आहेत. कोरोना आणि परीक्षा या दोन्ही मुद्द्यांवर या मॅसेजेसमधून चिंता व्यक्त केली जात आहे. त्या सर्वाबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना माहिती दिली असल्याचं आदित्य ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वर्षा गायकवाड यांच्यासाठी विद्यार्थ्यांच्या करिअरबरोबरच त्यांची सुरक्षादेखिल तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळं संबंधित मंडळांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून यावर शक्य तो तोडगा काढण्यचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता सरकारवर विश्वास ठेवावा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. वाचा - Paytm युझर्ससाठी सुवर्णसंधी! घरबसल्या मिळवा 2 लाख; समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया आमदारांशी चर्चा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षांबाबत आमदारांशी चर्चा करत आहेत. सर्वपक्षीय नेते, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे, असं स्पष्ट करत काही दिवसातच निर्णय कळवू, असंही शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे.We have been receiving messages from students of 10th & 12th about their concerns with regards to covid and examinations. I have been discussing with & conveying them all to Min @VarshaEGaikwad ji who has the safety of students as top most priority, along with their careers(1/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 9, 2021
विविध पक्षांच्या आमदारांची मते जाणून घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याऐवजी जूनमध्ये ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी अशी भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर सुविधांचा विचार करता, ऑनलाईन परीक्षेला विरोध असल्याचं यापूर्वीही समोर आलं आहे. वाचा - MPSC परीक्षा पुढे ढकलल्यानंतरही सरकारचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. या परीक्षा ऑनलाईन घेता येतील का? याचादेखिल आढावा घेण्यात आला मात्र त्यासाठी लागणारी यंत्रणा उभारायला जास्त वेळ लागणार असल्याने ते शक्य नाही. त्यात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येनं सगळीकडंच शिखरं गाठायला सुरुवात केली आहे. अशा परीस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता सरकारला परीक्षा घेण्यासाठी खास SOP (Standard operating procedure SOP) लागू करावा लागेल. तसंच विद्यार्थी आणि पालकांची मतंही सरकारला विचारात घ्यावी लागणार आहे.In light of recent upsurge of Covid-19 cases, I've been holding consultations with student representatives, elected representatives from all parties, tech giants, parents, teachers & other sector experts regarding alternatives for assessment of HSC & SSC board students. (1/2) pic.twitter.com/0LbnMv6aXu
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 9, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.