Home /News /national /

खळबळजनक! आणखी एक hospital कोरोनाच्या विळख्यात; लस घेतलेले 35 doctor positive

खळबळजनक! आणखी एक hospital कोरोनाच्या विळख्यात; लस घेतलेले 35 doctor positive

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयानंतर (Sir Ganga Ram Hospital Delhi) एम्स रुग्णालयातही (Delhi AIIMS) कोरोना घुसला आहे.

    नवी दिल्ली, 09 एप्रिल: दिल्लीमधून (Delhi coronavirus) खळबळनजक बातमी समोर येते आहे. आणखी एका रुग्णालयात कोरोना घुसला आहे. सर गंगाराम रुग्णालयानंतर (Sir Ganga Ram Hospital Delhi) आता दिल्लीतील एम्स रुग्णालयातही (Delhi AIIMS) कोरोना घुसला आहे. या रुग्णालयातील 35 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह (Doctors corona positive) झाले आहेत. गेल्या आठवडाभरात ऑल इंडिया इन्स्‍टीट्यूट ऑफ मेडिकल साइन्सेजमझधील 35 डॉक्टर कोरोना संक्रमित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये ज्युनिअर, सीनिअर, स्पेशालिस्ट अशा सर्व डॉक्टर्सचा समावेश आहे. बहुतेकांमध्ये सौम्य लक्षणं दिसतं आहेत. त्यामुळे काही डॉक्टरांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बहुतेक डॉक्टरांनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. डॉक्टरांसोबतच 50 पेक्षा जास्त आरोग्यकर्मचारीही कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळते आहे. पण याबाबत अधिकृतरित्या काही माहिती देण्यात आलेली नाही. हे वाचा - फक्त एक डोस पुरेसा; Johnson & Johnson ची कोरोना लस आता भारतात याआधी सर गंगाराम रुग्णालयात  37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यापैकी पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतरांना होम आयोसेलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.  यापैकी बहुतेक डॉक्टर हे कोरोना रुग्णांवर उपचार करत होते. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या सर्व डॉक्टरांमध्ये सौम्य लक्षणं आहेत, कुणाचीही प्रकृती गंभीर नाही. ओपीडी आणि ओटी सेवेवर मर्यादा देशातील सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या दिल्लीतीलएम्समधील ओपीडी आणि जनरल ओटी सेवा मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उपचाराच्या आणि सर्जरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक रुग्णांना त्याचा फटका बसणार आहे. त्यांची प्रतीक्षा आता आणखी वाढणार आहे. फक्त आवश्यक आणि गंभीर प्रकरणांच्या सर्जरी केल्या जाणार आहे. दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता दिल्ली सरकारनं लोक नायक रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठीच्या बेडची संख्या 1000 वरुन वाढवून 1500 केली आहे. सोबतच जीटीबी रुग्णालयातील बेडची संख्या 500 वरुन 1000 केली आहे. याशिवाय दातांच्या डॉक्टरांनाही कोविड रुग्णालयांमध्ये ड्यूटीवर ठेवलं जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहाता, हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचा - Weekend Lockdown वाढू शकतो; आठवडाभर राहणार कडक निर्बंध? उद्या सर्वपक्षीय बैठक मागील 24 तासात दिल्लीत 7437 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोनामुळे चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे. आता दिल्ली कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 23181 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा वाढून 11157 वर पोहोचला आहे. मागील चोवीस तासांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 8.10 टक्के नोंदवला गेला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Covid-19 positive, Delhi, Delhi News, Doctor contribution, India

    पुढील बातम्या