जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Success Story : शाळेत असतानाच गमावली ऐकण्याची शक्ती, तीव्र तापात दिली परीक्षा, IAS सौम्या शर्माचा संघर्षमय प्रवास

Success Story : शाळेत असतानाच गमावली ऐकण्याची शक्ती, तीव्र तापात दिली परीक्षा, IAS सौम्या शर्माचा संघर्षमय प्रवास

आयएएस सौम्या शर्मा - सक्सेस स्टोरी

आयएएस सौम्या शर्मा - सक्सेस स्टोरी

IAS सौम्या शर्मा यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देऊ शकते.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. मात्र, या कठीण परीक्षेत अनेक जण मेहनतीने प्रयत्न करुन अत्यंत संघर्षमयी प्रवास करत आपले स्वप्न पूर्ण करतात. IAS सौम्या शर्मा यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यांनी अनेक संकटांना धैर्याने तोंड दिले. त्यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देऊ शकते. त्यांच्या आयुष्यात कदाचित एकच ब्रीदवाक्य आहे - लाइफ मस्ट गो ऑन. आज जाणून घेऊयात, त्यांचा यशस्वी प्रवास. सौम्या शर्मा यांचा संघर्षमय प्रवास -  IAS सौम्या शर्मा या दिल्लीच्या रहिवासी आहेत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतले. कायद्याच्या शेवटच्या वर्षाला असताना सौम्या शर्माने यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सौम्या शर्मा यांना लहान वयातच एका मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. असे असूनही त्यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही आणि नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. वयाच्या 16 व्या वर्षी IAS सौम्या शर्मा यांची श्रवणशक्ती अचानक गेली. सौम्याच्या उपचारासाठी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना डॉक्टरांकडे गेले पण उपयोग झाला नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सौम्या यांची 90 ते 95 टक्के ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मात्र, नंतर त्यांनी या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला आणि लढवय्याप्रमाणे जगू लागला. आता त्या श्रवणयंत्राच्या मदतीने ऐकतात. हेही वाचा - Success Story : IAS साठी IPS ची ट्रेनिंग मधेच सोडली, शेवटी मिळवलंच! कार्तिक जीवाणींचा संघर्ष फळाला IAS सौम्या शर्माने 2017 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत 9वा क्रमांक मिळविला होता. त्यांची मार्कशीट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यांनी सर्व पेपरमध्ये उत्कृष्ट गुण मिळवले. सौम्या शर्मा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे यासाठी त्यांनी केवळ 4 महिने तयारी केली होती. वास्तविक त्यांनी कायद्याच्या शेवटच्या वर्षातच परीक्षा देण्याचे ठरवले होते. यूपीएससी मुख्य परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी सौम्या शर्माची प्रकृती खालावली होती. त्यांना 102 ते 104 अंशांपर्यंत ताप होता. पण त्यांनी हार न मानता बेशुद्धावस्थेतही परीक्षा दिली. परीक्षेच्या मधल्या जेवणाच्या ब्रेकमध्येही त्यांना ड्रिप लावावे लागले. इतक्या अडचणी असतानाही त्यांनी देशात 9वा क्रमांक पटकावला होता. IAS सौम्या शर्मा सध्या महाराष्ट्र केडरमध्ये तैनात आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्ली केडरमध्येही काम केले आहे. सौम्या सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तेथे त्यांचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण करण्यात सौम्याच्या मेहनत आणि समर्पणाचे फळ मिळाले. तर त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांना मुख्य परीक्षेत निराश होऊ दिले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात