मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Career Tips: वर्षाला लाखो रुपये पगाराचं पॅकेज हवंय ना? मग एम्प्लॉयर ब्रँडिंगमध्ये करा करिअर; ही घ्या माहिती

Career Tips: वर्षाला लाखो रुपये पगाराचं पॅकेज हवंय ना? मग एम्प्लॉयर ब्रँडिंगमध्ये करा करिअर; ही घ्या माहिती

एम्प्लॉयर ब्रँडिंगमध्ये करा करिअर

एम्प्लॉयर ब्रँडिंगमध्ये करा करिअर

तुमच्याकडे करिअर संदर्भात इतर काही प्रश्न असल्यास किंवा एखादा कोर्स एक्सप्लोर करायचा असेल तर तुम्ही @News18lokmat या ट्विटर हँडलवर टॅग करून माहिती देऊ शकता.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 मार्च:  बोर्डाच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी शाळांमधून कॉलेजांमध्ये जाण्यासाठी सज्ज होतील. मात्र, परीक्षा संपल्यानंतर ते निकाल लागेपर्यंतच्या काळाचा उपयोग तुम्ही योग्य करिअरची निवड करण्यासाठी नक्की करू शकता. तुम्हाला योग्य करिअर निवडण्यासाठी मदत व्हावी, या साठी दर आठवड्याला आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या करिअर मार्गांविषयी माहिती देणार आहोत. यामुळे तुम्हाला शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी, व्यवसाय करण्यासाठी नक्कीच मदत होईल. तसेच तुमच्याकडे करिअर संदर्भात इतर काही प्रश्न असल्यास किंवा एखादा कोर्स एक्सप्लोर करायचा असेल तर तुम्ही @News18lokmat या ट्विटर हँडलवर टॅग करून माहिती देऊ शकता.

खरं तर, आजच्या स्पर्धात्मक जॉब मार्केटमध्ये चांगल्या टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी कंपन्यांना खूपच कष्ट करावे लागतात, व तिथेच एम्प्लॉयर ब्रँडिंग येते. टॅलेंट अॅडोरच्या मते, नोकरीसाठी इच्छुक असणारे 78 टक्के उमेदवार कंपनीची सर्वसमावेशक माहिती घेतात आणि कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना काय सुविधा पुरवते याचाही व्यवस्थित अभ्यास करतात. 84 टक्के उमेदवार हे एखाद्या कंपनीची प्रतिष्ठा पाहून तिथं नोकरी करण्याबाबात निर्णय घेतात, व त्यावरून ठरवतात नोकरीसाठी कुठे अर्ज करायचा. तर, वर्केबलच्या सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की, जेव्हा कंपनीचं एम्प्लॉयर ब्रँडिंग सक्रिय असेल तेव्हा 10 पैकी 9 उमेदवार नोकरीसाठी अर्ज करण्याची शक्यता असते.

1-2 नव्हे तब्बल 5000 जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा; सेंट्रल बँकेत नोकरीची संधी सोडूच नका; करा अप्लाय

अनेकदा वेतन वाढ करूनही 50 टक्के उमेदवार नकारात्मक प्रतिष्ठा असलेल्या कंपनीत काम करण्यास नकार देतात. त्यामुळेच आता प्रत्येक कंपनीला एम्प्लॉयर ब्रँडिंगची आवश्यकता भासू लागली आहे. कंपनीची मूल्ये, संस्कृती आणि फायदे यासह एम्प्लॉयर म्हणून कंपनीची प्रतिष्ठा सामायिक करणं, राखणं आणि टिकवून ठेवणे आदींचा यामध्ये समावेश होतो.

आजच्या अनिश्चित काळात, व्यवसायांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. ज्यामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा आणि एकूण यश प्रभावित होऊ शकते. या आव्हानांना तोंड देऊ शकणारा आणि प्रतिकूल परिस्थितीत लवचिकता दाखवू शकेल, असा मजबूत ब्रँड स्थापन करणं आवश्यक आहे. कंपनीचा भक्कम पाया तयार करण्याच्या या प्रक्रियेत एम्प्लॉयर ब्रँडिंग महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. एम्प्लॉयर ब्रँडला प्राधान्य देऊन, एखादी कंपनी उच्च प्रतीचे टॅलेंट असणाऱ्यांना नोकरीसाठी आकर्षित करू शकते. कंपनीतील सध्याचे कर्मचारी टिकवून ठेवू शकते आणि उद्योगाची सकारात्मक प्रतिष्ठा निर्माण करू शकते.

मोठी बातमी! BSF नंतर आता CISF कडूनही खूशखबर; अग्निवीरांना मिळणार 10% आरक्षण

एम्प्लॉयर ब्रँडिंगमध्ये नोकरीच्या अनेक संधी आहे. या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत, ते जाणून घेऊया.

एम्प्लॉयर ब्रँडिंग मॅनेजर: एम्प्लॉयर ब्रँडिंग मॅनेजरची भूमिका सध्या सर्वात व्यापक आहे. ही भूमिका ऑल राउंडर अशीच असते. विविध माध्यमांद्वारे दर्जेदार प्रकल्प वितरीत करण्यासाठी नेतृत्वासह सहयोग करण्याचे कामही हे करतात. सोशल मीडिया आणि वैयक्तिक संवादांद्वारे एम्प्लॉयर ब्रँड तयार करणे, व त्याची देखभाल करणे, संशोधन करणे आणि कंपनीच्या एम्प्लॉयर प्रतिष्ठेचे परीक्षण करणं आदी एम्प्लॉयर ब्रँडिंग मॅनेजरच्या जबाबदाऱ्या असतात.

टॅलेंट मॅनेजमेंट स्पेशलिस्ट: एखाद्या कंपनीत, संस्थेत सकारात्मक कामाचे वातावरण तयार करण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकूण कर्मचाऱ्यांचा अनुभव वाढवणारे उपक्रम विकसित करण्यासाठी टॅलेंट मॅनेजमेंट स्पेशलिस्ट जबाबदार असतात. ते कर्मचारी आणि कंपनी यांच्यातील संवाद आणि सहयोग सुधारण्यासाठीदेखील काम करतात.

10वी पास आहात ना? मग ही सुवर्णसंधी सोडूच नका; भारतीय पोस्टात सरकारी नोकरी; करा अप्लाय

मार्केटिंग अँड कम्युनिकेशन स्पेशलिस्ट: मार्केटिंग अँड कम्युनिकेशन स्पेशलिस्ट कंपनी, संस्थेच्या मार्केटिंग प्लॅन विकसित आणि कार्यान्वित करतात. ज्यामुळे सध्याचे कर्मचारी व भविष्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने एम्प्लॉयर ब्रँडचा प्रचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. ते कंपनीच्या वेबसाइट, सोशल मीडिया चॅनेल यासह इतर मार्केटिंग चॅनेलसाठीही कंटेंट तयार करण्याचे काम करतात.

ऑर्गनायझेशन इफेक्टिवनेस अँड वेलनेस मॅनेजर: कामासाठी चांगलं वातावरण तयार करणं, निरोगी सवयींना प्रोत्साहन देणं, मानसिक आणि भावनिक आरोग्य संसाधनं प्रदान करणं आदींद्वारे टीमच्या सर्वांगीण कल्याणाला प्राधान्य देणं, अशी जबाबदारी ऑर्गनायझेशन इफेक्टिवनेस अँड वेलनेस मॅनेजरची असते. कंपनीच्या संस्कृती आणि यशाला आकार देण्यासाठी हे उपयोगी ठरतात.

ना कोणती परीक्षा ना टेस्ट, भारत सरकारच्या या विभागामध्ये थेट मिळेल नोकरी; ही पात्रता असणं आवश्यक

पात्रता आणि निकष

एम्प्लॉयर ब्रँडिंगमध्ये करिअर करण्यासाठी नोकरीची भूमिका आणि संस्थात्मक नैतिकता यावर आधारित पात्रता निकष बदलू शकतात. येथे मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर शिक्षणाला प्राधान्य दिलं जाते. तसेच ब्रँडिंग, मार्केटिंग किंवा कम्युनिकेशनमध्ये संबंधित कामाचा अनुभव आवश्यक असतो. शिक्षण आणि कामाच्या अनुभवाच्या पलीकडे, एचआर प्रोसेस, मार्केटिंग, मॅनेजमेंट आदी कौशल्यांना महत्त्व दिलं जातं.

एम्प्लॉयर ब्रँडिंग व्यावसायिकांच्या कौशल्यांत अंतर्गत आणि बाह्य भागधारकांशी प्रभावीपणे कनेक्ट होण्यासाठी मजबूत संवाद आणि परस्पर कौशल्यांचे अद्वितीय मिश्रण आवश्यक आहे. तसेच नाविन्यपूर्ण प्लॅन आणि धोरणे विकसित करण्यासाठी सर्जनशीलता, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि अपेक्षांवरील डेटा गोळा करण्यासाठी, व त्याचे विश्लेषण करण्यासाठी विश्लेषणात्मक कौशल्ये तसेच उत्कृष्ट प्रोजेक्ट मॅनेजमेंट आवश्यक असते. एकाचवेळी अनेक प्रोजेक्टवर देखरेख करण्याची क्षमता असणारा कर्मचारी हा एखाद्या संस्थेसाठी नेहमीच एक संपत्ती असते. या व्यतिरिक्त, सोशल मीडिया, परफॉर्मन्स मार्केटिंग आणि गूगल अ‍ॅनॅलिटिक्स यासह डिजिटल लँडस्केपची चांगली समज आता या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी आवश्यक आहे.

पगार किती मिळतो?

एम्प्लॉयर ब्रँडिंग क्षेत्रात करिअर करताना तुमचं नोकरीचं पद, अनुभव आणि स्थान यासारख्या घटकांवर पगार ठरतो. उदाहरणार्थ, एका वर्षाचा कामाचा अनुभव असलेल्या उमेदवाराचे पगाराचे पॅकेज वर्षाला 7-8 लाख रुपयांचं मिळू शकतं. भारतातील एम्प्लॉयर ब्रँडिंग मॅनेजरचा सरासरी पगार वर्षाला 25 लाख रुपये आहे. टॅलेंट मॅनेजमेंट स्पेशलिस्टच्या पगाराची सरासरी वर्षाला 12 लाख आहे. एकंदरीत, एम्प्लॉयर ब्रँडिंग हा जगभर झपाट्यानं वाढणारा करिअर पर्याय आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams