मुंबई, 17 मार्च: कार्यकाळानंतर अग्नीवीरांच्या नोकरीचं काय? असा सवाल अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्यांनी विचारला होता. त्यावर आता उत्तर मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी BSF नं अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण देण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता CISF नं ही अग्निवीरांना नोकरीत 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अग्नीवीरांच्या नोकरीची चिंता दूर झाली आहे.
CISF द्वारे आयोजित केलेल्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेतही सूट मिळेल. अर्जदार अग्निवीरच्या पहिल्या बॅचचा आहे की त्यानंतरच्या बॅचचा आहे यावर वयाची सवलत अवलंबून असेल. त्याच वेळी, गृह मंत्रालयाने अलीकडेच माजी अग्निशमन दलाच्या जवानांसाठी बीएसएफच्या भरतीसाठीही अशीच घोषणा केली होती.
रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची संधी; या पदासाठी लवकरच नोकरभरती, असा करा अर्ज
भारतीय सैन्याने अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार 20 मार्च 2023 पर्यंत joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. पहिल्या अर्जाची अंतिम तारीख 15 मार्च होती, ती आता 20 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. अग्निवीर अंतर्गत, भारतीय लष्कर स्टोअर कीपर, लिपिक आणि तांत्रिक यासह विविध पदांसाठी भरती करेल.
10वी पास आहात ना? मग ही सुवर्णसंधी सोडूच नका; भारतीय पोस्टात सरकारी नोकरी; करा अप्लाय
गेल्या वर्षी (2022) केंद्र सरकारनं 'अग्निपथ' योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना 'अग्निवीर' म्हटलं जातं. या तरुणांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सैन्यात नोकरी दिली जाईल. चार वर्षानंतर या तरुणांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या तरुणांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिल, हा मुद्दा घेऊन अग्निवीर योजनेवर टीका झाली होती.
झालेली टीका लक्षात घेऊन गृह मंत्रालयानं चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर या तरुणांना संरक्षण दलात सहभागी करून घेण्याची तरतूद केली होती. मात्र, यामुळे केवळ 25 टक्के अग्निवीरांचाच प्रश्न सुटत होता. उर्वरित 75 टक्के अग्निवीर बरोजगार राहिले असते म्हणून त्यानंतर लगेचच केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समधील 10 रिक्त जागा अग्निवीरांसाठी राखीव ठेवल्या जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यावेळीदेखील माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचसाठी उच्च वयोमर्यादा पाच वर्षे आणि त्यानंतरच्या बॅचसाठी तीन वर्षांनी शिथिल केली जाईल, असं जाहीर केलं होतं. त्या पाठोपाठ आता बीएसएफमध्येही माजी अग्निवीरांना संधी दिली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Indian army, Job Alert, Jobs Exams