मुंबई, 14 मार्च: तुम्ही सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने भरती काढली आहे. त्यात भरावयाच्या जागांनुसार तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. या रिक्त जागा विविध फिल्डमधील पदांसाठी आहेत. तुम्हीही सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असाल तर अर्ज करू शकता.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने डेप्युटी डायरेक्टर आणि इतर पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया 11 मार्च 2023 पासून सुरू झाली असून 30 मार्च 2023 रोजी संपेल. ज्या उमेदवारांना UPSC द्वारे भारत सरकारच्या या विभागांमध्ये नोकरी करायची आहे, त्यांनी दिलेल्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्या. या भरती प्रक्रियेद्वारे UPSC 45 पदं भरण्यात येणार आहेत.
भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या
सहसंचालक: 3 पदे
हॉर्टिकल्चर स्पेशालिस्ट: 1 पद
असिस्टंट हॉर्टिकल्चर स्पेशालिस्ट: 2 पदे
मार्केटिंग ऑफिसर: 5 पदे
फायनान्स अधिकारी: 1 पद
सीनिअर डिझाइन ऑफिसर: 5 पदे
स्पेशलिस्ट ग्रेड III: 10 पदे
खाण सुरक्षा उपसंचालक: 18 पदे
महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार आणि कोणतीही परीक्षा नाही; उद्या शेवटची तारीख; इथे करा अप्लाय
पात्रतेचे निकष असे
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध तपशीलवार नोटिफिकेशनमध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
या पदांसाठी अर्ज फी
उमेदवार अर्ज शुल्क म्हणून 25 रुपये रोख किंवा SBI च्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून भरू शकतात. SC/ST/PWBD तसेच महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
UPSC संदर्भातील इतर माहिती
या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल आणि त्यांचा श्रेणीनिहाय किमान कटऑफ UR/EWS-50 गुण, OBC-45 गुण, SC/ST/PwBD-40 गुण असू शकतात. मुलाखतीचे एकूण गुण 100 असतील. या शिवाय, या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रकियेसंदर्भातील कोणतीही अतिरिक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तुम्ही वयोमर्यादा आणि पात्रतेच्या अटींबद्दलची माहिती तिथून मिळवू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 23 आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Central government, Job Alert, Upsc