जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 10वी पास आहात ना? मग ही सुवर्णसंधी सोडूच नका; भारतीय पोस्टात सरकारी नोकरी; करा अप्लाय

10वी पास आहात ना? मग ही सुवर्णसंधी सोडूच नका; भारतीय पोस्टात सरकारी नोकरी; करा अप्लाय

भारतीय पोस्टात सरकारी नोकरी

भारतीय पोस्टात सरकारी नोकरी

नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च:  सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडिया पोस्ट, तमिळनाडू सर्कलने स्टाफ कार ड्रायव्हरच्या 58 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही पदं तमिळनाडू पोस्टल सर्कल अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 मार्च 2023 पर्यंत किंवा त्या पूर्वी या पदासाठी अर्ज करू शकतात. नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात. या संदर्भात ‘जागरण जोश’ने वृत्त दिलं आहे. Notification Details India Post Staff Car Driver Recruitment 2023 : No. MSE/89-2/XV/2021 India Post Staff Car Driver Recruitment 2023 साठी महत्त्वाची तारीख. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. 1-2 नव्हे ‘या’ गावातील सर्वच जण आहेत YouTuber; नोकरी नाही तर व्हिडीओ बनवून कमवतात पैसे रिक्त जागा किती? एकूण 58 जागा भरल्या जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता हलक्या आणि जड वाहनांसाठीचं ड्रायव्हिंग लायसन्स असावं. मोटर मॅकेनिझमची माहिती असावी. (उमेदवारांना वाहनातील किरकोळ समस्या दूर करता यायला हव्या.) हलकं व जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव मान्यताप्राप्त शाळेतून किंवा शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण केली असावी. वय, शैक्षणिक पात्र, अर्जाची प्रक्रिया यासाठी वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन डाउनलोड करा. इंडिया पोस्ट स्टाफ कार ड्रायव्हर भर्ती 2023 नोटिफिकेशन कसे डाउनलोड करावे इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. होम पेजवरील अनाउन्समेंट सेक्शनला भेट द्या. ‘Recruitment of 58 posts of Staff Car Driver (ordinary grade) under direct recruitment in Tamilnadu Circle PDF Icon [2384 KB]’ या लिंकवर क्लिक करा. नवीन विंडोमध्ये तुम्हाला India Post Staff Car Driver Recruitment 2023 Notification ची पीडीएफ दिसेल. त्यावर क्लिक करून डाउनलोड करा आणि सेव्ह करून ठेवा. तुम्हालाही परदेशात जॉब हवाय ना? ‘या’ महिलेनं आतापर्यंत 3000 लोकांना दिलीये नोकरी; तुम्हीही साधा संपर्क अर्ज कसा करायचा इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 31 मार्च 2023 रोजी किंवा त्या पूर्वी नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर विहित फॉरमॅटमध्ये अर्ज करू शकतात. नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना त्यांच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं जोडावी लागतील.

News18लोकमत
News18लोकमत

अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल. त्यामुळे ते नोटिफिकेशन नीट वाचून त्यात दिलेल्या फॉरमॅटनुसार इच्छुकांनी नोकरीसाठी अर्ज करावेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात