मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: नोकरी शोधताना घ्या 'या' गोष्टींची काळजी, मुलाखतीमध्ये होईल फायदा; इथे मिळेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Career Tips: नोकरी शोधताना घ्या 'या' गोष्टींची काळजी, मुलाखतीमध्ये होईल फायदा; इथे मिळेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

करिअर ऑप्शन्स

करिअर ऑप्शन्स

Career Tips: रामकृष्ण व्यमाजल (Ramakrishna Vyamajala) यांनी कोरोनाच्या काळात फायनान्स सर्व्हिस सेक्टरमध्ये (Finance service sector) नोकरीच्या संधी शोधण्याचे मार्ग सांगितले आहेत.

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: कोविड-19 (COVID-19) ची तिसरी लाट आता ओसरत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या नवीन नोकऱ्यांसाठी परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये नवीन कर्मचारी भरतीला सुरुवात झाली आहे. न्यूज 18च्या 'नौकरी की बात' (Naukari Ki Bat) या सिरीजमध्ये, होम फर्स्ट फायनान्सचे चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर, रामकृष्ण व्यमाजल (Ramakrishna Vyamajala) यांनी कोरोनाच्या काळात फायनान्स सर्व्हिस सेक्टरमध्ये (Finance service sector) नोकरीच्या संधी शोधण्याचे मार्ग सांगितले आहेत. सध्या आर्थिक सेवा क्षेत्राचाही वेगाने विकास होत आहे. ही वाढ केवळ प्रशिक्षित आणि इच्छुक कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेनेच टिकून राहू शकते. हा अनिश्चिततेचा काळ आहे. परंतु, जे लोक पटकन संधी (Opportunity) शोधतील आणि परिस्थितीशी जुळवून घेतील, त्यांचं भविष्य नक्कीच चांगलं असेल, असं ते म्हणाले. त्यांच्या मुलाखतीतील काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी देण्यात आले आहेत.

प्रश्न - महामारीच्या काळात ज्यांची नोकरी गेली आहे, त्यांनी काय केलं पाहिजे?

उत्तर - अशा व्यक्तींनी आशा सोडू नये. नोकरी (Jobs) गमावणं हे दुर्बलतेचं लक्षण नसून बदलत्या परिस्थितीचं लक्षण आहे. साथीच्या रोगानं प्रत्येक गोष्टीचे संदर्भ आणि त्या करण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे नैसर्गिक परिणाम म्हणून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा त्या बदलल्या आहेत.

प्रश्न - अशा तरुणांनी नवीन स्कील्स विकसित करावी की आहेत ती स्कील्स सुधारावीत?

उत्तर - या महामारीच्या काळात ज्या लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत त्यापैकी बहुतेक नोकऱ्या अशा आहेत ज्यांची प्रासंगिकता (Relevance) नाहीशी झाली आहे. काही ठिकाणी संपूर्ण उद्योगच प्रभावित झाल्यामुळे नोकऱ्या गेल्या आहेत. अशा लोकांना पुन्हा कामावर परतायचं असल्यास, त्यांनी सध्या महत्त्व प्राप्त झालेलं क्षेत्र किंवा भूमिका निवडली पाहिजे. त्यासाठी आवश्यकतेनुसार आपली स्कील्स (Skills) विकसित करावीत.

महत्त्वाची बातमी! बोर्डाकडून उद्या 12वीच्या Offline परीक्षांचे प्रवेशपत्र मिळणार

प्रश्न - महामारीनंतर अनेक ऑनलाईन कोर्स सुरू आहेत, तरुणांनी हे कोर्स केले पाहिजेत का आणि कंपन्या अशा अभ्यासक्रमांना प्राधान्य देतील का?

उत्तर - महामारीनंतर जर नवीन संधी चालून आल्या तर तेव्हा नोकरी गेलेले तरुण या भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज नसतील. म्हणून, पूर्व तयारी म्हणून कोर्सेच्या माध्यमातून नवीन स्कील्स आत्मसात करणं, ही चांगली कल्पना आहे. अशा तरुणांनी केवळ लोकप्रियतेपेक्षा विषयाची समज, आवड आणि त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा यावर आधारित अभ्यासक्रम निवडले पाहिजेत.

प्रश्न - आता मार्केट हळूहळू ओपन होत आहे तर तरुणांनी कुठे आणि कशाप्रकारे नोकऱ्या शोधल्या पाहिजेत?

उत्तर - ज्या प्रकारे लोक नोकऱ्या शोधत आहेत त्याचप्रकारे कंपन्यासुद्धा त्यांचं काम करू शकतील अशा लोकांच्या शोधात आहेत. जॉब पोर्टल, सल्लागार, जॉब फेअर, वृत्तपत्रातील जाहिराती इ. नोकऱ्या शोधण्याचे सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. त्या नियमितपणे तपासा, स्वतःला अपडेट ठेवा आणि शक्य तितक्या ठिकाणी अर्ज करा.

प्रश्न - COVID-19 भरती प्रक्रियेत काही बदल होतील, असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर - सध्या प्रत्येक उद्योग, प्रक्रिया आणि लोकांशी संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये बदल दिसत आहे. विविध कंपन्यांच्या भरती प्रक्रियेतही बदल झाला आहे. पूर्व-मूल्यांकन, ऑनलाइन मुलाखती, भरती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial intelligence) वापर इत्यादी प्रकारचे हे बदल आहेत. यापैकी काही बदल तात्पुरते असू शकतात तर काही बदल कायमस्वरूपी राहतील. ही बदलाची प्रक्रिया समजून घेणं आणि त्यांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करणं महत्वाचं आहे.

प्रश्न - मुलाखतीची तयारी कशी करावी?

उत्तर - भूतकाळात काय घडलं आहे आणि ज्या परिस्थितीमुळे नोकरी गेली आहे त्याबद्दल पारदर्शक असणं महत्वाचं आहे. कंपनीबद्दल आणि तुम्ही ज्या पोझिशनसाठी अर्ज करत आहात त्याबद्दल जाणून घ्या. त्यानंतर स्वत: ला चांगलं तयार करा, कंपनीच्या उत्पादनांबद्दल जाणून घ्या, तिथं काम करणाऱ्या किंवा पूर्वी तिथं काम केलेल्या लोकांशी बोला. यामुळे तुम्हाला मुलाखतीतील प्रश्नांना आत्मविश्वासानं सामोरं जाण्यास मदत होईल.

या नोकरदारांचे Work From Home चे दिवस संपले; तुम्हालाही जावं लागणार ऑफिसमध्ये?

प्रश्न - सध्याच्या परिस्थितीत कोणत्या प्रकारच्या नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि तो करिअरचा चांगला पर्याय असेल का?

उत्तर - सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगाचा आपल्या जीवनावर, नोकऱ्यांवर आणि आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर काय परिणाम होतो याचा अंदाज बांधणं फार कठीण आहे. काही गोष्टींमध्ये कायमस्वरूपी बदल होतील तर काहींवर तात्पुरता परिणाम होईल. उदाहरणार्थ, ट्रॅव्हल इंडस्ट्रीवर थोडासा परिणाम झाला आहे. परंतु, अल्पावधीतच ती पुन्हा मजबूतपणे उभी राहिल्याचं दिसत आहे. एकूणच सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी वेळ लागेल आणि खरा दीर्घकालीन बदल काही काळानंतरच कळेल. एक गोष्ट कायमस्वरूपी बदलली आहे ती म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. प्रत्येक उद्योगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या बदलांसह स्वत:मध्ये बदल करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे.

प्रश्न - आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि ऑटोमेशनसारख्या टेक्नोलॉजीमुळे काय बदल होऊ शकतात?

उत्तर - आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence), बिग डेटा (Big Data) यासारख्या तंत्रज्ञानाचा दीर्घकालीन प्रभाव पाहण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आपली क्षमता, निर्णय घेताना डेटाचा वापर आणि कठीण गोष्टी सोप्या करताना तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता यावर काही दृश्यमान बदल अवलंबून आहेत.

प्रश्न - या क्षेत्रात नोकरीच्या संधी काय आहेत आणि भविष्यातील परिस्थिती काय असेल हे तुम्ही आमच्या वाचकांना सांगू शकाल का?

उत्तर - पुनरुज्जीवित होऊ पाहणाऱ्या सर्व क्षेत्रांप्रमाणेच, आर्थिक सेवा क्षेत्र देखील वेगाने वाढत आहे. ही वाढ केवळ प्रशिक्षित आणि इच्छुक कर्मचाऱ्यांच्या (Staff availability) उपलब्धतेनेच टिकून राहू शकते. व्यवसायांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांना सेवा देण्याच्या मार्गात बदल होणार आहेत, त्यामुळे या बदलांशी जुळवून घेणारे आणि गरजा पूर्ण करणारे कर्मचारी असावेत अशी अपेक्षा आहे. हा अनिश्चिततेचा काळ आहे. परंतु, जे लोक पटकन संधी शोधतील आणि परिस्थितीशी जुळवून घेतील, त्यांचं भविष्य नक्कीच चांगलं असेल.

प्रश्न - स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एखाद्या उमेदवारानं काय करावं?

उत्तर - ज्यांच्या नोकर्‍या टिकून राहिल्या आहेत ते नक्कीच नशीबवान आहेत. मात्र, त्यांनी सावध राहण्याची आणि उद्योग व कंपनीच्या बदलत्या गरजा समजून घेण्याची गरज आहे. गरजांमध्ये वेगानं बदल होत आहेत. ज्यांना हे बदल लवकर समजणार नाहीत ते मागे राहतील. म्हणून, परिस्थितीशी जुळवणं घेणं हीच सध्या जगण्याची गुरुकिल्ली आहे. काम करण्याच्या जुन्या पद्धतींना चिकटून राहू नका. नवीन गोष्टी शिकत रहा. तुमच्या वरिष्ठांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घ्या आणि त्यानुसार वागा.

प्रश्न - या क्षेत्रातील विविध पदांसाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत?

उत्तर - आर्थिक सेवा क्षेत्रात विविध प्रकारच्या भूमिका आहेत. सेल्ससाठी ग्रॅज्युएशन (Graduation) किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन (Post Graduation) आवश्यक आहे. मर्यादित यश असूनही पुन्हा-पुन्हा काम करण्याची ऊर्जा आणि समर्पण ही या पोझिशन्समध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. या क्षेत्रात उत्पादन भिन्नता खूप मर्यादित आहे आणि त्यामुळे कॉन्टॅक्ट्स खूप महत्त्वाचे ठरतात. सेवा क्षेत्र (Service Sector) हे वेग आणि अचूकतेवर अवलंबून असतं. जे नवीन तंत्रज्ञान झपाट्याने स्वीकारतात ते यशस्वी होतात. तिसऱ्या प्रकारच्या पोझिशन्स प्रॉडक्शनमध्ये असतात. त्यासाठी थोडी सर्जनशीलता, नावीन्य आणि ग्राहकांच्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता आवश्यक असते. या ठिकाणीच कंपनी स्वतःला वेगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणूनच या सेक्टरवर खूप लक्ष दिलं जातं. सपोर्ट फंक्शन्स ही अशी पोझिशन आहे जी व्यवसाय आणि त्याच्या कर्मचार्‍यांना डिलिव्हरी करण्यात मदत करते. अशी कामं करण्यासाठी ह्युमन रिसोर्स, अर्थ, क्रेडिट अंडररायटिंग यासारखी विशेष कौशल्यं आणि शिक्षण आवश्यक असतं.

प्रश्न - कंपनीच्या भरती प्रक्रियेसोबत, हे देखील सांगा की नोकरी शोधणारे तुमच्या फर्मपर्यंत कसे पोहोचू शकतात?

उत्तर - आमची भरती प्रक्रिया सोपी आहे. इच्छुक उमेदवार विविध ठिकाणी जाहिरात केलेल्या खुल्या जागांसाठी अर्ज करू शकतात. आमच्या वेबसाइटवरील करिअर पेज, आमचं लिंक्डइन पेज किंवा careers@homefirstindia.com या आयडीवर तुमचा सीव्ही (CV) ईमेल करू शकतात. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या दोन ते तीन फेऱ्यांतून जावं लागेल.

प्रश्न - आपण कोणत्या प्रकारची स्कील्स शोधत आहात आणि आपण त्याचं मूल्यांकन कसं करता?

उत्तर - प्रत्येक पोझिशनसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात त्यानुसार स्कील्स आणि ज्ञानाची आवश्यकता असते. सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे शिकण्याची आणि काम करण्याची इच्छा. आमचं मुलाखत तंत्र आम्हाला उमेदवारातील या पैलूचं मूल्यांकन करण्यास मदत करतं. क्रॉस व्हेरिफिकेशनवर (Cross Verification) आधारित मुलाखतींच्या (Interview) अनेक फेऱ्या घेऊन आम्ही उमेदवार योग्य असल्याची खात्री करून घेतो.

UPSC मुलाखतीत विचारले जातात कल्पनेपलीकडील प्रश्न; उत्तरं वाचून जाल चक्रावून

प्रश्न - तुमच्या कंपनीच्या आणि या क्षेत्राच्या वाढीची शक्यता काय आहे?

उत्तर - आमचं सेक्टर कायम अॅक्टिव्ह (Active) मानलं जातं. कारण आर्थिक गरज नेहमीच असते. या प्रवासात काही चढ-उतार आले असतील, पण वाढीचा वेग नेहमीच चढता राहिला आहे. आम्ही उद्योग विकासाच्या बाबतीत नेहमीच पुढे असलो तरी, आमच्यावरदेखील चढ-उतारांचा प्रभाव पडतो. हे एक असं क्षेत्र आहे जे उत्कृष्ट लोकांना आकर्षित करतं. याशिवाय आम्ही नाविन्यपूर्णतेचं केंद्र आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा (Multi National Companies) कणा आहोत.

First published:

Tags: Artificial intelligence, Career, Career opportunities, Covid-19, Finance, Job alert, Success, Unemployment, User data, जॉब