मुंबई, 27 एप्रिल: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीमार्फत दरवर्षी आयएएस, आयपीएस, आयएफएस यासह भारतातील नागरी सेवांमधील विविध महत्त्वाच्या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. यूपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ही परीक्षा देताना अनेकदा उमेदवारांचा गोंधळ उडतो, व त्यांना येत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा देताना ते परीक्षेच्या वेळी चुका करतात. यंदाच्या वर्षी 28 मे 2023 रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी केवळ एक महिना शिल्लक असल्यानं ही परीक्षा देण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा अभ्यासही वेगानं सुरू असेल. आज आम्ही यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अशा काही टिप्स देणार आहोत, ज्या अभ्यास करताना त्यांनी अंमलात आणल्यास परीक्षेत होणाऱ्या छोट्या-छोट्या चुका टाळण्यास मदत होईल. जर तुम्हीही यूपीएससीची तयारी करीत असाल, तर तुमच्यासाठी या टिप्स खूप महत्त्वपूर्ण ठरतील.
सेल्फ नोट्सवर लक्ष केंद्रीत करावे परीक्षेला एक महिना शिल्लक असताना, परीक्षेची तयारी करणारे काही उमेदवार सहसा इतर संदर्भ पुस्तकांवर लक्ष केंद्रित करतात. पण त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता असते. अशावेळी उमेदवारांनी अभ्यासासाठी त्यांनी परीक्षेसंबंधी तयार केलेल्या सेल्फ नोट्सवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. विविध संदर्भ पुस्तकांवर अवलंबून राहिल्यानं गोंधळ उडू शकतो. परीक्षेला अवघा एक महिना शिल्लक असल्यानं या वेळेचा उपयोग उमेदवारांनी गेल्या वर्षभरात शिकलेल्या प्रत्येक गोष्टीची पुष्टी करण्यासाठी केला पाहिजे. या काळात नवीन ज्ञान घेणं त्याच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं. क्या बात है! ‘या’ IT कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; दुप्पट होणार पगार; सर्वांना मिळेल सारखी सॅलरी पेपर सोडवण्यावर भर यूपीएससी नमुना पेपर बरेच उमेदवार सोडवत नाहीत. यामुळे बऱ्याचदा प्रत्यक्ष परीक्षेसाठी दिलेल्या वेळेत संपूर्ण पेपर सोडवणं शक्य होत नाही. परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरं माहीत असतानासुद्धा केवळ वेग कमी असल्यानं दिलेल्या वेळेत ते पेपर पूर्ण सोडवू शकत नाही. त्यामुळे सध्या जर उमेदवारांनी यूपीएससी नमुना पेपर सोडवले, तर त्यांचा पेपर सोडवण्याचा वेग वाढवण्यास मदत होईल. तसंच मागील वर्षाचे पेपर सोडवल्यानं परीक्षेचा पॅटर्नसुद्धा लक्षात येईल. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे कर्दनकाळ; सोडली होती परदेशी बँकेतील नोकरी; या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा मॉक टेस्टचा अभाव यूपीएससी परीक्षा देण्याची तयारी करणारे अनेक उमेदवार मॉक टेस्टचा वापर करीत नाहीत, तर नवीन संकल्पनांचा अभ्यास करण्यात वेळ घालवतात. यामुळे त्यांना त्यांच्या ज्ञानाची पातळी आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल माहिती नसते. मॉक टेस्ट तुम्हाला यूपीएससी पूर्व परीक्षेशी जुळवून घेण्यास मदत करते. पत्रकारांनो, परदेशात शिक्षण घ्यायचंय? मग Oxford युनिव्हर्सिटीत जर्नालिस्ट फेलोशिप करा ना; ही घ्या माहिती संकल्पना समजून घ्या बहुतेक उमेदवार परीक्षेचा अभ्यास करताना एखादी संकल्पना समजून घेण्याऐवजी लक्षात ठेवण्यावर भर देतात. प्रत्यक्षात मात्र अभ्यास करताना संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, आणि ती केवळ लक्षात ठेवून उत्तीर्ण होऊ शकत नाही. अरे याला जिद्द म्हणावी की काय? 1962 पासून तब्बल 56 वेळा दिली 10वीची परीक्षा; 57व्या वेळी झाले पास चालू घडामोडींचं ज्ञान ठेवणं परीक्षेच्या पहिल्या टप्प्यापासूनच बर्याच उमेदवारांना चालू घडामोडींचं ज्ञान ठेवणं आवश्यक आहे. उमेदवारांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून ट्रेंडिंग संकल्पना समाविष्ट केल्यास परीक्षेत उत्तरं अधिक चांगल्याप्रकारे देता येतील.