जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PNB होणार देशातली दुसरी मोठी बँक, ग्राहकांना करावे लागतील हे 6 बदल

PNB होणार देशातली दुसरी मोठी बँक, ग्राहकांना करावे लागतील हे 6 बदल

PNB होणार देशातली दुसरी मोठी बँक, ग्राहकांना करावे लागतील हे 6 बदल

PNB, Bank - pnbमध्ये बँकांचं विलीनीकरण झाल्यानंतर ग्राहकांना बदल करावे लागतील

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 सप्टेंबर : सरकारी बँक PNB- पंजाब नॅशनल बँकमध्ये OBC (Oriental Bank of Commerce) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचं विलीनीकरण होण्यासाठी PNB बोर्डानं तत्वत: मान्यता दिलीय. या विलीनीकरणानंतर PNB देशातली सर्वात मोठी दुसरी सरकारी बँक बनेल. या विलीनीकरणानंतर बँकांची संख्या 27वरून 12वर येईल. या विलीनीकरणानंतर ग्राहकांवर होणारे परिणाम 1. तुमच्या खात्याचा नंबर आणि इंटरनेट कस्टमर IDमध्ये होणार बदल - तुम्ही तुमचा ईमेल आणि मोबाइल नंबर बँकेकडे अपडेट करून द्या. त्यामुळे बँक खाते नंबर आणि आयडी बदलला तर लगेच मेसेज पाठवील. ‘यामुळे’ PPF, NSC चे व्याज दर होऊ शकतात कमी 2. चेकबुक बदलेल - या विलीनीकरणानंतर तुमचं चेकबुक बदलेल.तुमचं आताचं चेकबुक थोडा काळ चालेल. पण नंतर नवीनच वापरावं लागेल. 3. इथे करावा लागेल बदल -  ग्राहकांना नवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड मिळेल. ते डिटेल्स तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, इन्शुरन्स कंपनीज, म्युच्युअल फंड्स, नॅशनल पेंशन सिस्टिम अशा ठिकाणी द्यावे लागतील. रेल्वेमध्ये सुरू आहे 252 जागांसाठी भरती, ‘या’ पदांसाठी करा अर्ज 4. नव्या ECS, SIP साठी बदल करावे लागतील - तुम्हाला तुमच्या ECSमध्ये बदल करावे लागतील. ECSशी संबंधित फाॅर्म ऑनलाइन किंवा ब्रँचमध्ये जाऊन भरावा लागेल. नवा SIP रजिस्ट्रेशन आणि इन्स्ट्रक्शन फाॅर्म भरावा लागेल. महाराष्ट्र पोलीस दलात मोठी व्हेकन्सी, मुंबईत जास्त जागा, ‘अशी’ होईल निवड 5. ब्रँचचा पत्ता बदलेल - विलीनीकरणानंतर बँकेच्या काही शाखा बंद होऊ शकतात. तुमच्या बँकेचा पत्ता बदलू शकतो. त्यामुळे IFSC आणि MICR कोड बदलेल. 6. डिपाॅझिट आणि लेंडिंग रेटमध्ये बदल नाही - फिक्स्ड डिपाॅझिटचा दर अगोदरचा सुरू राहील. पण बँक नवा व्याज दर घोषित करू शकते. कर्जाचा व्याज दर तोच राहील. VIDEO : किल्ले पार्ट्यांसाठी देणार का? आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pnb
  • First Published :
जाहिरात
जाहिरात