मुंबई, 03 फेब्रुवारी: महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 177 पदांसाठी भरती होणार आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयातील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 18 फेब्रुवारी असणार आहे. उमेदवार आपला अर्ज पोस्टाद्वारे अथवा ऑनलाइन स्वरुपात भरू शकतात.
एकूण पदांची संख्या 177
1.वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ज्ञ)- रिक्त पदे- 06
2.मनोविकृती चिकित्सक रिक्त पदे- 29 जागा
3.नेत्र शल्य चिकित्सक रिक्त पदे- 13 जागा
4.शरीरविकृती शास्त्रज्ञ रिक्त पदे- 09 जागा
5.क्षयरोग चिकित्सक रिक्त पदे- 11 जागा
6.बधिरीकरण तज्ज्ञ रिक्त पदे- 12 जागा
7.स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ- रिक्त पदे- 09 जागा
8. क्ष-किरण शास्त्रज्ञ रिक्त पदे- 15 जागा
9.अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, रिक्त पदे- 04 जागा
10. बालरोग तज्ज्ञ- रिक्त पदे- 09 जागा
वेतन श्रेणी- 67,700 -20, 8700, अर्जदाराचे वय- अर्ज करणारा उमेदवार भारतीय असावा. अमागास करिता अर्जदाराचं वय हे 2020पर्यंत 38 वर्ष ते 43 वर्षांपर्यंत असावे.
कोण करू शकतं अर्ज- M.B.B.S, वैद्यकीय विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे इच्छुक उमेदवार, त्या विषयातील तज्ज्ञ असणारे पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार.
प्रवेश शुल्क- खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 300 रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क DD द्वारे आकारण्यात येईल.
उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेले उमेदवार संपूर्ण राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र असणार आहेत.
हेही वाचा-Post Graduate उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरीची संधी
हेही वाचा-नोकरी शोधताना होऊ शकते फसवणूक, वापरा 'या' सोप्या 5 टिप्स