मराठी बातम्या /बातम्या /करिअर /TCS Youth Employment Program मुळे बेरोजगारीचं टेन्शन होईल दूर, आतापर्यंत 24,800 पेक्षा जास्त जणांना मिळाली नोकरी

TCS Youth Employment Program मुळे बेरोजगारीचं टेन्शन होईल दूर, आतापर्यंत 24,800 पेक्षा जास्त जणांना मिळाली नोकरी

TCS Youth Employment Program: देशातील महत्त्वाची कंपनी आणि सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा याकरता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

TCS Youth Employment Program: देशातील महत्त्वाची कंपनी आणि सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा याकरता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

TCS Youth Employment Program: देशातील महत्त्वाची कंपनी आणि सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा याकरता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील महत्त्वाची कंपनी आणि सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने (Job Opportunity in TCS) तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा याकरता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. कोरोना काळात ज्यांच्यावर बेरोजगारीचं संकट आलं आहे त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी यूथ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम (TCS YEP) सुरू केला आहे. तरुण, ग्रामीण महाविद्यालयांतील महिला, बेरोजगार पदवीधर, विशेषतः सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना सक्षम करण्यासाठी हा कंपनीचा सीएसआर फ्लॅगशीप कार्यक्रम आहे.

या प्रोग्रॅमअंतर्गत टीसीएसने (TCS Youth Employment Program) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, बिझनेस कम्यूनिकेशन स्कील, प्रोग्रॅमिंग आणि डोमेन स्कील्सवर लक्ष्य केंद्रित करणाऱ्या कोर्सेसचा समावेश केला आहे. टीसीएसच्या वक्तव्यानुसार या स्कील्ससाठी तरुणांना ट्रेनिंग दिले जाईल. शिवाय हे स्पेशल ट्रेनिंग आणि मेंटरशीपनंतर रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी देखील कंपनी त्यांना सहकार्य करणार आहे.

हे वाचा-Zee Ent. चे डायरेक्टर पुनीत गोयंकांना हटवण्यासाठी Invescoचे जोरदार प्रयत्न

आतापर्यंत, कंपनीला 1,384 नॉमिनेशन्स मिळाले आहेत, ज्यांना 700 पेक्षा जास्त TCS सहयोगींद्वारे त्यांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या प्रवासात समर्थन दिले जात आहे.  80% पेक्षा जास्त उमेदवार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अधिकतर नॉमिनेशन कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मित्रांचे किंवा नातेवाईकांचे आहेत.

हे वाचा-Baramati Agro Recruitment: बारामती कृषी लिमिटेड जळगाव इथे मोठी पदभरती

24,800 जणांना मिळाला रोजगार

टीसीएसने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या यूथ प्रोग्रॅममुळे 4,900 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तर नॉन-IT यूथ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅमअंतर्गत 9,200 विद्यार्थी आणि 56 एक्सटर्नल ट्रेनर आणि प्रोफेशनल्सना ट्रेन करण्यात आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार या प्रोग्रॅमच्या स्थापनेनंतर 1,24,000 तरुणांना ट्रेनिंग देण्यात आली आहे. या प्रोग्रॅमनंतर खासगी आणि सरकारी कंपन्यांमध्ये जवळपास 24,800 जणांना रोजगार मिळाला आहे. TCS मध्ये एक विनामूल्य ऑनलाइन कोर्स देखील आहे - TCS iON Career Edge. तरुण प्रोफेशनल्ससाठी हा कोर्स आहे. हा 15 दिवसांचा अभ्यासक्रम असून यामुळे नोकरी शोधणाऱ्यांना त्यांचे मुख्य रोजगार कौशल्य सुधारण्यास मदत होईल.

First published:

Tags: Job, Job alert