मराठी बातम्या /बातम्या /मनी /Zee Entertainment चे डायरेक्टर पुनीत गोयंकांना हटवण्यासाठी Invescoचे प्रयत्न; NCLT मध्ये केस दाखल

Zee Entertainment चे डायरेक्टर पुनीत गोयंकांना हटवण्यासाठी Invescoचे प्रयत्न; NCLT मध्ये केस दाखल

झी एंटरटेनमेंटमधील भागधारक कंपनी इन्व्हेस्कोनं (Invesco) 'झी'चे पुनीत गोयंका (Invesco Punit Goenka) यांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, कंपनीनं अद्याप 'ईजीएम' बोलावली नसल्याने इन्व्हेस्कोनं राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) धाव घेतली आहे.

झी एंटरटेनमेंटमधील भागधारक कंपनी इन्व्हेस्कोनं (Invesco) 'झी'चे पुनीत गोयंका (Invesco Punit Goenka) यांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, कंपनीनं अद्याप 'ईजीएम' बोलावली नसल्याने इन्व्हेस्कोनं राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) धाव घेतली आहे.

झी एंटरटेनमेंटमधील भागधारक कंपनी इन्व्हेस्कोनं (Invesco) 'झी'चे पुनीत गोयंका (Invesco Punit Goenka) यांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, कंपनीनं अद्याप 'ईजीएम' बोलावली नसल्याने इन्व्हेस्कोनं राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) धाव घेतली आहे.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: मनोरंजन विश्वातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली झी एंटरटेनमेंट (Zee Entertainment Latest News) सध्या वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत आहे. 'झी'चं सोनी पिक्चर्समध्ये विलीनकरण करण्याची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे. तसेच झी एंटरटेनमेंटमधील भागधारक कंपनी इन्व्हेस्कोनं (Invesco) 'झी'चे पुनीत गोयंका (Invesco Punit Goenka) यांना हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, कंपनीनं अद्याप 'ईजीएम' बोलावली नसल्याने इन्व्हेस्कोनं राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (NCLT) धाव घेतली आहे.

  झी एंटरटेनमेंट लिमिटेडचे एमडी, सीईओ आणि डायरेक्टर पुनीत गोयंका यांना हटवण्यासाठी इनव्हेस्को अडून बसली आहे. ईजीएम म्हणजेच विशेष सर्वसाधारण सभा (EGM) बोलवण्यात कंपनीला अपयश आल्यानं इन्व्हेस्कोनं कंपनीविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडं तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठात आज (गुरूवार, 30 सप्टेंबर 2021) याबाबत सुनावणी होत आहे.

  हे वाचा-आजच पूर्ण करा ही 6 आर्थिक आणि बँकेशी संबधित कामं, अन्यथा होईल मोठं नुकसान

  यात इन्व्हेस्कोच्या वतीनं ध्रुव लीलाधर अँड कंपनी तर झी एंटरटेनमेंटच्या वतीनं व्हाइल ट्रिलिगल बाजू मांडणार आहे. सूचीबद्ध कंपन्यांसाठी सध्याच्या नियमांनुसार एखाद्या कंपनीला किमान 10 टक्के भागधारक असलेल्या एका गुंतवणूकदाराकडून नोटीस मिळाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत 'ईजीएम'ची तारीख जाहीर करणं गरजेचं असतं.

  झी एंटरटेनमेंटकडं आहे 2 ऑक्टोबरपर्यंत अवधी

  इन्व्हेस्कोनं याबाबतचं पहिलं पत्र 11 सप्टेंबरला दिलं होतं. याचा अर्थ झी एंटरटेनमेंटकडं तारीख घोषित करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंत अवधी आहे. जर कंपनी निर्धारित कालावधीत तारखेबाबत घोषणा करण्यात अपयशी ठरली तर इन्व्हेस्कोच्या वतीनं तारीख जाहीर केली जाऊ शकते. झी एंटरटेनमेंटचे दोन मोठे शेअर होल्डर इन्व्हेस्को आणि ओपन हायजर यांची कंपनीत 17.88 टक्के भागीदारी आहे.

  हा डाव इन्व्हेस्कोवरही उलटू शकतो

  काही तज्ज्ञांच्या मते, 'झी'कडे अजूनही ईजीएम बोलवण्यासाठी अवधी शिल्लक आहे. त्यामुळे इन्व्हेस्को हे प्रकरण घेऊन राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे का गेली, हे अद्याप समजू शकलेलं नाही. कदाचित हा डाव इन्व्हेस्कोवरच उलटू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. जर गुरुवारी न्यायाधीकरणानं यावर निकाल दिला नाही तर आम्ही ईजीएम बोलवण्यासाठी तयार होतो. परंतु, इन्व्हेस्कोनं हे प्रकरण न्यायाधीकरणाकडे दाखल केलं, असं झी एंटरटेनमेंट कंपनी म्हणू शकते.

  हे वाचा-6 महिन्याच्या निचांकी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर, काय आहे आजचा सोन्याचा भाव

  जर हे प्रकरण फारच ताणलं गेलं तर, पुनीत गोयंका यांना हटवण्यासाठी इन्व्हेस्कोनं खेळलेला डाव निष्फळ ठरू शकतो. इन्व्हेस्कोनं पुनीत गोयंका यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर झी एंटरटेनमेंटनं सोनी पिक्चर्स नेटवर्कमध्ये (Sony Pictures Network) विलीनीकरणाची घोषणा केली होती. आता या निकालाकडे आणि झी काय पाऊल उचलते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  First published:

  Tags: Money, Zee media