Home /News /career /

MH BOARD 10TH AND 12TH RESULT: आला..आला बोर्डाच्या निकालाचा आठवडा; प्रवेशासाठी लगेच 'ही' IMP कागदपत्रं जोडा; लिस्ट बघा

MH BOARD 10TH AND 12TH RESULT: आला..आला बोर्डाच्या निकालाचा आठवडा; प्रवेशासाठी लगेच 'ही' IMP कागदपत्रं जोडा; लिस्ट बघा

निकालासाठी नक्की कोणती कागदपत्रं IMP (Important Documents for admission after board results) असणार आहेत अशा कागदपत्रांची लिस्ट आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 05 जून: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांतच बोर्डाचे निकाल (10th, 12th Board exam results) जाहीर होण्याची चिन्हं आहेत. यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा बोर्डाचे निकालही (Maharashtra state board exams Result) उशिराच लागणार अशी माहिती मिळत होती. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही बोर्डाचे निकाल हे वेळेतच (MH board exam results dates) लागणार आहेत. येत्या आठवड्यातच बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र स्टेट दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या निकालाच्याआधीच अकरावी (11th FYJC Admissions in Maharashtra), पॉलीटेक्नीक (Polytechnic Admissions 2022) आणि इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्दयार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा न करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मात्र निकाल लागल्यानंतर प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवावी लागणार आहे. म्हणून निकालासाठी नक्की कोणती कागदपत्रं IMP (Important Documents for admission after board results) असणार आहेत अशा कागदपत्रांची लिस्ट आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. MH BOARD 10TH AND 12TH RESULT: निकालाआधी विद्यार्थ्यांची वाढली धक..धक; 'या' तारखेला लागेल निकाल कधी लागणार बोर्डाचे निकाल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल (MH board HSC Result 2022) हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल (MH board SSC Result 2022) हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागणार आहे. किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाहीदहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडू मिळाली आहे. MH BOARD 10TH AND 12TH RESULT: अवघ्या काही दिवसांत बोर्डाचा निकाल; रिझल्टनंतर 'या' IMP गोष्टी आधी करा निकालानंतर 'ही' कागपत्रं असतील आवश्यक गुणपत्रिका (Board Marksheet) स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate) उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate) शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) आधार कार्ड (Aadhar card) जातीचा दाखला (Caste Certificate) रहिवासी दाखला (Address Proof) पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)
    First published:

    Tags: Board Exam, Exam Fever 2022, Exam result, HSC, Ssc board, State Board

    पुढील बातम्या