मुंबई, 06 जून: गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून सतत नागरिकांची आणि प्रशासनाची झोप उडवणारा कोरोना गेल्या चार ते पाच महिन्यात जरा कुठे शांत झाला होता. असं वाटत असतानाच आता कोरोनानं मी पुन्हा येईन म्हणत एंट्री मारली आहे. राज्य आणि देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अगदी राजकारण्यांपासून तर बॉलिवूड सेलिब्रिटीजपर्यंत अबेकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. मात्र असं असेल तरीही राज्यातील शाळा मात्र उन्हाळी सुटीनंतर पुन्हा सुरु (Maharashtra school opening date) होणार आहेत. यासंबंधीची घोषणा स्वतः शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शाळा जरी सुरु होणार असल्या तरी कोरोनाचे काही नियम (Important Corona precautions for Students) मात्र पाळावेच लागणार आहेत.
बघता बघता मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची आकडेवारी (Maharashtra Corona Update) फुगू लागली आहे. राज्यात शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेली कोरोना आकडेवारी विद्यार्थी आणि पालकांची डोकेदुखी झाली आहे. वाढत्या कोरोनात मुलांना परत सहा;येत पाठवायचं का? शाळेत मुलांना कोरोनाची लागण होणार नाही याची हमी काय? असे प्रश्न पालकांना पडू लागले आहेत. मात्र चिंता करू नका. कोरोनचे काही नियम पाळले तर मुलं अगदी सुरक्षित राहू शकतील.
अर्थात कोरोनाचे काही नियम शाळा आणि प्रशंसनांकडू लावलरच जारी करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मात्र हे नियम पूर्णपणे पाळले जाताहेत का हे बघण्याची जबाबदारी शाळेची असणार आहे. आता राज्यात कुठेही मास्क सक्ती नसली तरी यापुढे जर मास्क सक्ती आली तर शाळांमध्येही मुलांना मास्क लावणं बंधनकारक असणार आहे.
हे नियम पाळणं आवश्यक
विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना, शाळेत असताना आणि शकतून बाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे.
तसंच विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये एक लहान सॅनेटाईझरची बाटली असणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी कोणाच्याही संपर्कात आल्यानंतर किंवा कुठे स्पर्श केल्यानंतर सात हात सॅनेटाईझ करत राहणं आवश्यक आहे.
तसंच डबा खाताना आणि डबा खाऊन झाल्यानंतरही हात सॅनेटाईझ करत राहणं आवश्यक आहे.
शाळेतुन वर्गात विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं महत्त्वाचं आहे.
तसंच मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांचे कपडे सॅनेटाईझ करून धुवायला टाकणे हेही महत्वाचं आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शाळा बंद होणार? शिक्षणमंत्री म्हणाल्या...
यासंबंधी आणि इतर सर्व नियमावली टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Maharashtra News, School, Varsha gaikwad