मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थ्यांनो, बॅग भरायला घ्या! राज्यातील शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर; शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

विद्यार्थ्यांनो, बॅग भरायला घ्या! राज्यातील शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर; शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

शाळा पुन्हा सुरु होण्याच्या तारखेची घोषणा

शाळा पुन्हा सुरु होण्याच्या तारखेची घोषणा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा पुन्हा सुरु (Maharashtra school reopen) होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 06 जून: देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये उन्हाळी परीक्षाही घेण्यात आल्या आहेत. त्यात आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा पुन्हा सुरु (Maharashtra school reopen) होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील शाळा 15 जून (Maharashtra School) रोजी सुरु (Maharashtra school opening date) होणार आहेत. तर 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत.

संपूर्णपणे कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळा पुन्हा सुरु होणार की नाहीत अशी चिंता विद्यार्थ्यांना आणि पालकांना लागून राहिली होती. मात्र शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाल्या शिक्षणमंत्री

राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळणार आहे. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेण्यात येईल असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे.

शाळा बंद करण्याचा विचार नाही

"कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनचे सर्व नियम पाळूनच वर घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे." असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे.

First published:

Tags: Education, Maharashtra News, School, School exam, State Board, Varsha gaikwad