Home /News /career /

'तो' परत आलाय! वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा शाळा बंद होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या....

'तो' परत आलाय! वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा शाळा बंद होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या....

पुन्हा शाळा बंद होणार?

पुन्हा शाळा बंद होणार?

कोरोनाच्या या वाढत्या रुग्ण परिस्थितीवर शाळा पुन्हा बंद होणार का? यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 05 जून: देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शाळा कॉलेजेस सुरु झाले होते. मात्र आता कोरोनाच्या ओमिक्रोनच्या नव्या व्हेरिएन्टनं (Omicron) परत चिंता वाढवली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण निर्बंध हटवल्यानंतर आता पुन्हा राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी (Maharashtra Corona Update) वाढण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर किंग खान शाहरुख खान, कतरीना कैफ, आणि इतर काही कलाकारही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव होतोय का अशी स्थिती निर्माण झाली आहे. बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! कतरिना, आदित्य नंतर किंग खान शाहरूखही CORONA POSITIVE कोरोनाच्या या वाढत्या रुग्ण परिस्थितीवर शाळा पुन्हा बंद होणार का? कॉलेजेसच्या परीक्षा होणार का? शाळा बंद झाल्यात तर विद्दयार्थ्यांचं शिक्षण कसं होणार? याबाबत पालकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाल्या शिक्षणमंत्री "कोरोनाची ही वाढती आकडेवारी बघून लगेच शाळा बंद करणं योग्य ठरणार नाही, आम्ही सर्व शाळांना कोरोनचे सर्व नियम पाळूनच वर घेण्यास सूचना दिल्या आहेत. तसंच प्रत्येक शाळेमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी नियम पाळण्यास सांगितलं आहे. राज्यात मास्क सक्ती जरी नसली तरी शाळेत विद्यार्थ्यांनी किंवा बाहेरही सर्वांनी मास्क घालणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मास्कबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे." असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटलं आहे. MH BOARD 10TH AND 12TH RESULT: अवघ्या काही दिवसांत बोर्डाचा निकाल; रिझल्टनंतर 'या' IMP गोष्टी आधी करा मुंबईत कोरोना वाढतोय मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 961 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे आता पुन्हा मृत्यू होऊ लागले आहेत. कोरोनामुळे मुंबईत गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 374 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या 4880 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Maharashtra News, Schools closed, State Board, Varsha gaikwad, महाराष्ट्र

    पुढील बातम्या