नवी दिल्ली, 5 डिसेंबर : भारतीय प्रशासकीय सेवा विभाग हा देशातील नोकरशाहीतील सर्वात प्रभावशाली विभाग मानला जातो. या विभागांतर्गत उमेदवारांना विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळते. यात पास झालेले उमदेवार हे जिल्हा स्तरावर ते विविध प्राधिकरणांमध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि आयुक्तपदावर सेवा बजावतात. म्हणून या सेवेत जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा (CSE) मध्ये लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात.
यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परिक्षा आहे. यात प्रत्येकाला यश मिळते असे नाही. पण काही उमेदवार असेही असतात जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करतात. आयएएस अधिकारी गरिमा अग्रवाल याही अशाच उमेदवारांपैकी एक आहेत.
मध्य प्रदेशच्या खरगोनच्या गरिमाने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस रँक मिळवली होती. पण त्यांचे लक्ष्य वेगळे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
गरिमाचे शालेय शिक्षण सरस्वती विद्या मंदिर, खरगोन येथून झाले. त्या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांची मोठी बहीण, प्रीती अग्रवाल यांनी 2013 मध्ये भारतीय टपाल सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. गरिमाने शालेय जीवनापासून ते यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसपर्यंत प्रत्येक क्षेत्रात यश संपादन केले आहे.
हेही वाचा - गड्याचा नादच खुळा! NDA साठी सोडले IIT वर पाणी; मी नापास झाल्याचं सांगितलं अन्...
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देण्यापूर्वी गरिमाने आयआयटी हैदराबादमधून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये इंटर्नशिपही केली. यानंतर गरिमाने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षेत 240 वा क्रमांक मिळवला. मात्र, त्यांना आएएस व्हायचे होते. म्हणून त्यांनी पुन्हा तयारी केली.
त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात, त्याने 40 वी रँक मिळवली आणि 2018 मध्ये आयएएस अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले. यानंतर 2019-2020 मध्ये त्यांनी मसुरी येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या यशाचा मंत्र सांगताना गरिमा या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यूपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य आणि मुलाखतीची तयारी एकत्रच करावी, सक्सेस मंत्रा देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Ias officer, IIT, Upsc