मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

गड्याचा नादच खुळा! NDA साठी सोडले IIT वर पाणी; मी नापास झाल्याचं सांगितलं अन्...

गड्याचा नादच खुळा! NDA साठी सोडले IIT वर पाणी; मी नापास झाल्याचं सांगितलं अन्...

गौरव आणि त्याचे भाऊ विनीत.

गौरव आणि त्याचे भाऊ विनीत.

आयआयटी परिक्षा पास झाल्यावर त्याच्यावर पाणी सोडणारा असा तरुण विरळाच.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पुणे, 1 डिसेंबर : सैन्यदलात अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी जीवापाड मेहनत घेणारेही असतात. तर अपयश आल्यानंतर माघार घेणारेही असतात. मात्र, सैन्यदलात जाण्यासाठी देशातील सर्वात कठीण परिक्षा असलेल्या आयआयटी परिक्षा पास झाल्यावर त्याच्यावर पाणी सोडणारा असा तरुण विरळाच. हो हे खरंय. एनडीएमध्ये जाण्यासाठी एका तरुणाने आयआयटीचा त्याग केला.

गौरव यादव असे या तरुणाचे नाव आहे. बुधवारी खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA) मध्ये एनडीएच्या 143 व्या कोर्समध्ये त्याला सुवर्णपदकाने त्याला सन्मानित करण्यात आले. गौरव हा राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील जाजोर-बास गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याने आयआयटी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे सत्य आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवले आणि त्याचे एनडीएचे स्वप्न पूर्ण करत असताना दिल्लीतील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला.

त्याने दोनदा एनडीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीच्या टप्प्यावर अडखळल्याने त्याला याठिकाणी प्रवेश मिळू शकला नाही. मात्र, तिसऱ्यांदा त्याने यशाला गवसणी घातली.

बुधवारी एनडीएच्या पासिंग आऊट परेड कार्यक्रमाच्या वेळी त्याने आपल्या प्रवासाला उजाळा दिला.

सुवर्णपदक विजेत्या गौरव यादवचा भाऊ विनीत हासुद्धा सैन्यदलात आहे. त्यांनी सांगितले की, गौरवच्या मानसिक स्थितीबाबत कुटुंब एका क्षणी चिंतेत होते. जेव्हा त्याने त्याच्या भावाला त्याच्या आयआयटी निकालांबद्दल विचारले. तेव्हा त्याने त्याने सांगितले की, तो पास नाही होऊ शकला. मात्र, एनडीएमध्ये निवड झाल्यानंतरच त्याने आम्हाला सांगितले की, त्याने आयआयटीमध्ये सुद्धा प्रवेश मिळवला होता.

हेही वाचा - बाप गवंडी तर आई करते शिवणकाम, परिस्थितीवर मात करत तरुण UPSC पास

ते म्हणाले, "आज त्याने एक विलक्षण कामगिरी करून स्वतःला योग्य सिद्ध केले. आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्याच्या लष्करी कारकिर्दीची ही गौरवशाली सुरुवात आहे." रेवाडीच्या केरळ पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या गौरव यादवने इयत्ता दहावीमध्ये A+ ग्रेड मिळवली. यानंतर बारावीत त्याला 96 टक्के मिळाले होते.

First published:

Tags: Career, IIT, NDA, Pune, Success story