मराठी बातम्या /बातम्या /करिअर /IIIT मधून शिक्षण, पहिल्याच प्रयत्नात IPS पण ध्येय होतं IAS, अखेर पूर्ण केलंच!

IIIT मधून शिक्षण, पहिल्याच प्रयत्नात IPS पण ध्येय होतं IAS, अखेर पूर्ण केलंच!

IAS गरिमा अग्रवाल

IAS गरिमा अग्रवाल

आयएएस गरिमा अग्रवाल यांनी यूपीएससीच्या उमेदवारांना खास सल्ला दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

    नवी दिल्ली, 1 फेब्रववारी : मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अवघड नसते हे IAS गरिमा अग्रवाल यांनी सिद्ध केले आहे. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या IAS गरिमा यांनी देशातील दोन कठीण परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव उंचावले आहे. गरिमा अग्रवाल सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांची मोठी बहीणही सरकारी नोकरी करते. IAS गरिमा अग्रवाल यांचा यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घ्या.

    IAS गरिमा अग्रवाल यांचा जन्म 28 डिसेंबर 1991 रोजी मध्य प्रदेशातील खरगोन येथे झाला. त्यांनी हिंदी माध्यमाचे शिक्षण घेतले. त्यांचे शालेय शिक्षण खरगोन येथील सरस्वती विद्या मंदिरातून झाले. शालेय जीवनापासून ते यूपीएससी परीक्षेपर्यंत गरिमाने सर्वत्र यश मिळवले आहे. IAS गरिमा अग्रवाल सध्या तेलंगणामध्ये तैनात आहेत.

    IAS गरिमा अग्रवाल यांनी IIIT हैदराबादमधून B.Tech चे शिक्षण घेतले आहे. B.Tech ची पदवी मिळवल्यानंतर गरिमा अग्रवाल यांनी जर्मनीच्या कंपनीत इंटर्नशिप केली. गरिमा अग्रवाल यांनी 10वी मध्ये 92% आणि 12वी मध्ये 89% गुण मिळाले होते. त्या एका व्यापारी कुटुंबातील आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेची दीड वर्ष तयारी केली होती.

    हेही वाचा - नोकरी सोबतच UPSC ची तयारी, पठ्ठ्यानं करुन दाखवलं! IAS च बनला

    IAS गरिमा अग्रवाल हिने UPSC परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात 240 वा क्रमांक मिळविला. त्यावेळी त्यांना आयपीएस रँक मिळाली होती. मात्र, त्यांचे ध्येय आयएएस होण्याचे होते, म्हणून त्यांनी पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात 40 वी रँक मिळवून त्या आयएएस अधिकारी बनल्या.

    यूपीएससी उमेदवारांना हा सल्ला - 

    आयएएस गरिमा अग्रवाल यांनी यूपीएससीच्या उमेदवारांना खास सल्ला दिला आहे. यूपीएससी प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूची तयारी एकाच वेळी व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. UPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेत अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणूनच उजळणी करत राहणे महत्त्वाचे आहे. मॉक टेस्टपण द्यावी आणि आणि संशोधन केल्यानंतरच अभ्यास साहित्य निवडावे, असा सल्ला त्यांनी यूपीएससीच्या उमेदवारांना दिला आहे.

    First published:

    Tags: Career, Ias officer, Success story, Upsc, Upsc exam