मराठी बातम्या /बातम्या /करिअर /नोकरी सोबतच UPSC ची तयारी, पठ्ठ्यानं करुन दाखवलं! IAS च बनला

नोकरी सोबतच UPSC ची तयारी, पठ्ठ्यानं करुन दाखवलं! IAS च बनला

IAS कुणाल यादव (फाईल फोटो)

IAS कुणाल यादव (फाईल फोटो)

भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी परीक्षेत दरवर्षी लाखो उमेदवार अर्ज करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 31 जानेवारी : भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी परीक्षेत दरवर्षी लाखो उमेदवार अर्ज करतात. पण अगदी मोजकेच उमेदवार त्या परीक्षेत त्यात उत्तीर्ण होतात. यात अनेक जण नोकरी करत असतानाच या परीक्षेची तयारी करतात. तसेच यात अत्यंत मेहनत घेऊन यात उत्तीर्ण होतात. तुमच्या स्वप्नांसमोर अडथळे येऊनही तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकतात, हे रेवाडी शहरातील शक्तीनगर येथील रहिवासी असलेल्या कुणाल यादव यांनी आपल्या यशाने सिद्ध केले आहे.

कुणाल यादव यांनी नोकरीसोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्यातही ते यशस्वी झाले. याआधी त्यांनी बँकेची परीक्षाही पास केली होती. ज्यांना नोकरीसह UPSC परीक्षेची तयारी करायची आहे, त्या सर्व उमेदवारांसाठी IAS कुणाल यादव यांची यशस्वी गाथा प्रेरणादायी ठरू शकते.

आयएएस कुणाल यादव हा रेवाडीच्या शक्तीनगरचे रहिवासी आहेत. ते पहिल्यापासून अभ्यासात हुशार होते. रेवाडी शहरातील जैन पब्लिक स्कूलमधून बारावीच्या बोर्ड परीक्षेत ते नॉन मेडिकल स्ट्रीममध्ये जिल्ह्यात अव्वल आले होते. यानंतर कुणाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बीएससीचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी नॉन-मेडिकल शाखेत रसायन शास्त्राचे शिक्षण घेतले.

IAS कुणाल यादव यांनी 2015 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय सेवेची तयारी सुरू केली. 2015 मध्ये, त्यांनी प्रथमच SSC CGL परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांना नोकरी आवडली नाही म्हणून ते रुजू झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदासाठी अर्ज केला आणि त्यातही त्यांची निवड झाली.

हेही वाचा - स्वप्नांशी कोणतीही तडजोड नाहीच! नक्षली भागातील तरुणीची गरुडझेप, झाली IAS

कुणाल यादवने यूपीएससी परीक्षेपूर्वी इतर अनेक सरकारी परीक्षा दिल्या होत्या. स्टेट बँकेनंतर त्यांची आर्मीमध्ये स्टेशन मास्टर तसेच असिस्टंट कमांडंट या पदासाठीही निवड झाली. पण त्यांनी दोन्ही नोकऱ्या सोडल्या आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. नोकरीसोबतच त्यांनी आयएएस होण्याची तयारीही सुरू ठेवली.

2018 मध्ये ते पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षाही पास करू शकले नाही. यानंतर IAS कुणाल यादव हे 2020 मध्ये UPSC परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात 185 वा क्रमांक मिळविला. IAS प्रशिक्षणानंतर, 2021 मध्ये, त्यांची दिल्ली येथे आयकर विभागात निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. UPSC परीक्षेची तयारी नोकरी करूनही करता येते याचे उदाहरण म्हणजे IAS कुणाल यादव. ते रोज 10-12 तास सेल्फ स्टडी करत असत. त्यांचा हा प्रवास यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Career, Ias officer, Job, Success story, Upsc, Upsc exam