नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : युपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) देशभरातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करत असले तरी, फार कमी विद्यार्थ्यांना यश मिळतं. या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची स्वतःची एक पद्धत असते. त्यामुळेच आयएएस (IAS Officer) होऊन देशाची सेवा करण्याचे त्यांचं स्वप्न पूर्ण होतं. UPSC परीक्षेसाठी अभ्यासक्रम प्रचंड मोठा असतो. त्यामुळेच हा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होऊन रिविजन, मॉक टेस्ट साठीही वेळ काढावा लागतो. त्यामुळेच विद्यार्थी दिवसाचे 12-13 तास अभ्यास करतात. मात्र, सातत्याने अभ्यास करण्याबरोबरच स्मार्ट स्टडी देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. 2017 साली IAS ऑफिसर झालेल्या प्रेरणा सिंह (IAS Prerna Singh) यांनी देखील विद्यार्थ्यांना हाच सल्ला दिला आहे.
प्रेरणा सिंह यांच्यामते ‘UPSC परीक्षेचा अभ्यासक्रम मोठा असल्यामुळे स्मार्ट स्टडी करण्यावर भर द्यायला हवा. यासाठी नोट्स काढायला हव्यात म्हणजे, रिविजन करताना वेळ वाचतो’.
(Raksha Bandhan : या साईट्सवर आकर्षक गिफ्ट्सची रेलचेल; बहिणीला करा खूश)
प्रेरणा सिंह सांगतात उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस केली तर, आपला आत्मविश्वास वाढतो. त्यासाठी पाठांतर केल्यानंतर लिखाण करायला हवं. UPSC परीक्षेच्या अभ्यासासाठी इंटरनेटचा देखील वापर होऊ शकतो.
(काळ्याभोर केसांसाठी हेयर कलर सोडा; तेल वापरूनही संपेल पांढऱ्या केसांचा त्रास)
UPSC टॉपर्सचे इंटरव्यू पाहिल्यानंतर त्यांची स्टडी स्टॅटेजी आपल्याला समजते आणि त्याचा वापर करता येतो. प्रेरणा यांनीसुद्धा एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते 6 वी ते 12 वी च्या पुस्तकांचं वाचन करून UPSC परीक्षेसाठी पाया मजबूत करता येतो.
(हद्दच झाली! स्वातंत्र्य दिनी सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्रीच्या ब्राची चर्चा)
याशिवाय अभ्यास करताना स्वतःची रणनीती तयार करायला हवी. घाईगडबडीत अभ्यास पूर्ण होत नाही. त्यासाठी टप्प्यांनीच तयारी करावी लागते. प्रेरणा सिंह सांगता ‘मेल्स, प्रिलियम आणि इंटरव्यू हे तीनही टप्पे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला बेसिक क्लियर केल्यानंतर स्टॅंडर्ड पुस्तकांचा अभ्यास करायला सुरुवात करायला हवी’. म्हणजे चांगलं यश मिळतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ias officer, Inspiring story, Success stories, Upsc exam