बदलेली लाईफस्टाईल,जेवणातील भेसळ, केमिकलयुक्त शॅम्पू, हेअर कलर आणि तेल यांच्या वापरामुळे केस लवकर सफेद होतात. पण, काही घरगुती उपायांचा वापर करून पांढऱ्या केसांची समस्या कमी होऊ शकते.
2/ 10
पहिल्यांदा पांढरे केस दिसले तर, घाबरून जाण्याऐवजी आपण हे छोटे उपाय करू शकता. आपल्या केसांखाली पिगमेंट सेल्स असतात. त्या केसांना काळा रंग देतात. जेव्हा या पेशी मरतात तेव्हा केस पांढरे होतात.
3/ 10
केस अकाली पांढरे होऊ लागले असतील तर, केसांची काळजी खास घेणं आवश्यक आहे. केस पांढरे झाल्यावर कापण्याची चूक करू नका. यामुळे पांढरे केस लपवणं अवघड होते. लांब केसांच्या आत पांढरे केस झाकले जातात.
4/ 10
केस सफेद होणं सुरू झालं असेल तर, चहा,कॉफी,कोल्ड्रींक कमी प्रमाणात घ्या. त्याऐवजी,आपल्या आहारात अधिक अॅन्टीऑक्सिडन्ट्स घेणं आवश्यक आहे. याशिवाय फॉलिक अॅसिडयुक्त पदार्थ खा. ग्रीन टी प्यायला सुरूवात करा.
5/ 10
केस रंगवण्यासाठी हेयर कलरपेक्षा मेहंदी वापरणं चांगल आहे. यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक चमक येते. केसांसासाठी एखाद्या कंटिश्नर प्रमाणे काम करातात. नियमितपणे वापरल्याने आपले केस चमकदार बनतात.
6/ 10
केसं खूप वेगाने पांढरे होत असतील तर, त्यांना लगेच कलर करू नका. केस रंगवल्यास त्यांचा नैसर्गिक रंग निघून जातो. केसांचा रंग निवडताना ऑईल बेस्ड कलर निवडावा.
7/ 10
केस काळे करण्यासाठी 3 चमचा घट्ट नारळ तेलामध्ये 2 चमचे आवळा पावडर मिक्स करा. तेल आणि आवळा पावडर चांगल्याप्रकारे एकत्र होईपर्यंत हे तेल गरम करा. तेल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळाशी मॉलिश करा.
8/ 10
दुसऱ्या दिवशी शॅम्पूने स्वच्छ धुऊन टाका. आवळ्यात व्हिटॅमीन सी असल्याने कोलेजन वाढवण्याची क्षमता असते.
9/ 10
कांद्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑईल यांचं मिश्रण सफेद केसांची समस्या संपवेल. एका भांड्यात 1 मोठा चमचा कांद्याचं तेल घ्या. त्यात 1 चमचा ऑलिव्ह ऑईल टाका.
10/ 10
हे मिश्रण एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी मॉलिश करा. एक तासनंतर कोमट पाण्याने धुऊन टाका हा उपाय दररोजही केला जाऊ शकतो.