जयपूर, 12 जून: UPSC परीक्षेची तयारी कऱण्यासाठी अनेक जण अनेक वर्ष घातवतात पण जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावरही सव्वा वर्षांच्या अभ्यासात UPSC परीक्षेत भारतात दुसरा क्रमांक मिळवून IAS झालेल्या अधिकाऱ्याची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत.
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी UPSC परीक्षेत उत्तम गुण मिळवत IAS होणारे अक्षत धरमचंद जैन. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आई-वडिलांकडून प्रेरणा घेऊन शासकीय सेवेत नोकरी करण्याचा निश्चय मनाशी पक्का केला. त्यानुसार कठोर मेहनत आणि जिद्द न सोडता सकारात्मक केलेले प्रयत्न यातून त्यांनी यश खेचून आणलं.
अक्षत यांचे वडील पोलीस सेवेत तर आई महसूल सेवेत कार्यरत आहे.
हे वाचा-Success Story: चहा विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी
अक्षतला अभियांत्रिकीचा अभ्यास करण्याची आवडत होती. त्यामुळे तो अभ्यासक्रम पूर्ण करून मग UPSCसाठी त्यानं तयारी केली. 3 महिन्यांच्या अभ्यासावर पहिल्यांदा परीक्षा दिली मात्र केवळ 2 मार्कांसाठी ती संधी हुकली. त्यानंतर 2017 ते 2018 संपूर्ण वर्ष त्यांनी कठोर मेहनत घेऊन मन लावून अभ्यास केला. 2018 च्या परीक्षेत भारतात द्वितीय स्थान मिळवून अवघ्या 23 व्या वर्षी IAS झाले.
स्वत:वर विश्वास ठेवा आणि न डगमगता सकारात्मक विचाराने प्रयत्न करत राहा. प्रत्येक छोट्या गोष्टीच्या नोट्स काढायला हव्यात. मन लावून अभ्यास केला तर कमी वेळेत अधिक चांगला अभ्यास होतो असा यशाचा मंत्रच अक्षत यांनी तरुणाईला दिला.
हे वाचा-रिक्षा चालकाची मुलगी झाली परीक्षेत टॉपर, देशभरातून होतंय निशाचं कौतुक
हे वाचा-'वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं '
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.