मंडी, 10 जून : डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या रिक्षा चालकाच्या मुलीनं इयत्ता 10 वीमध्ये 98.14 टक्के मिळवून मेरिटमध्ये आली आहे. हिमाचल प्रदेशातील दहावीच्या बोर्डाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. मंडी इथे रिक्षा चालकाच्या मुलीनं मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर 98.14 टक्के मिळवत यश प्राप्त केलं आहे. स्वामी विवेकानंद वरिष्ठ माध्यमिक विद्यालय रामनगर मंडी (मंडी) येथील विद्यार्थिनी निशाने हिमाचल बोर्डात मेरिटलिस्टमध्ये 5 वा क्रमांक पटकावला आहे.
या यशाचं श्रेय निशाने आपल्या वडील आणि प्रधानाचार्य विरेंद्र कुमार यांच्यासह शिक्षकांना दिलं आहे. देशभरात निशानं मिळवलेल्या उत्तुंग यशामुळे कौतुक होत आहे. माझे वडील मंडी इथे रिक्षा चालवतात. मी रोज 7 ते 8 तास अभ्यास करत होते. त्यानंतर हे यश शिक्षकांच्या मदतीनं मिळवू शकले असं निशा म्हणते.
इयत्ता 10वीचा बोर्डाचा निकाल तुम्ही इथे पाहू शकता.
मेरिटमध्ये पहिल्या 5 मध्ये येणारे 4 जण हे मंडीमधील शाळेतील विद्यार्थी आहेत. निशा आणि तिच्यासोबत टॉपमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पुढे डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न असल्याचंही निशानं सांगितलं आहे. मंडी जिल्ह्यातील वंशिका शर्मा या विद्यार्थिनीनं 97.57 टक्के मिळवत मेरिटमध्ये 9 वं स्थान पटकावलं आहे. तिला पुढे विज्ञान क्षेत्रात करियर करायचं आहे.
हे वाचा-10 वी आणि 12 वीचा निकाल आज नाही, 20 दिवस करावी लागणार प्रतीक्षा
हे वाचा-'वडिलांनी वर्षभराच्या पगारातू मला अमेरिकेचं तिकीट काढून दिलं '
संपादन- क्रांती कानेटकर