मराठी बातम्या /बातम्या /करिअर /स्वप्नांशी कोणतीही तडजोड नाहीच! नक्षली भागातील तरुणीची गरुडझेप, झाली IAS

स्वप्नांशी कोणतीही तडजोड नाहीच! नक्षली भागातील तरुणीची गरुडझेप, झाली IAS

आयएएस नमिता जैन

आयएएस नमिता जैन

UPSC परीक्षेत बसलेल्या आणि त्यात यशस्वी झालेल्या प्रत्येक उमेदवाराची स्वतःची एक खास गोष्ट आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 30 जानेवारी : UPSC परीक्षेत बसलेल्या आणि त्यात यशस्वी झालेल्या प्रत्येक उमेदवाराची स्वतःची एक खास गोष्ट आहे. या प्रवासात प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. आज अशीच एक खास आणि यशस्वी उमेदवाराच्या प्रवासाची कहाणी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आणि या यशस्वी उमेदवाराचे नाव आहे IAS नम्रता जैन.

नम्रता जैन या छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. लहानपणापासूनच आयएएस होण्याचे त्यांनी ठरवले होते. मात्र, सरकारी नोकरीच्या मार्गात त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. आज जाणून घ्या, नम्रता जैन यांचा यशस्वी प्रवास.

नक्षलग्रस्त भागातील तरुणीचा संघर्षमय प्रवास -

आयएएस नम्रता जैन या छत्तीसगडच्या दंतेवाडा येथील आहेत. हा नक्षलग्रस्त भाग आहे, येथील साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. बेरोजगारी आणि घरगुती वादाच्याही घटना येथे सातत्याने घडत असतात. मात्र, या परिस्थितीतही 2जी इंटरनेट असलेल्या भागात राहणाऱ्या नम्रता जैन यांनी आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास अनेक अडचणींसह पूर्ण केला.

आयएएस नम्रता जैन यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण दंतेवाडा येथील कार्ली येथील निर्मल निकेतन शाळेत केले. तर 10वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्यासाठी काही अडचणी होत्या. कारण त्यांच्या घरच्यांनी त्यांना अभ्यासासाठी दूर कुठेतरी पाठवण्यास नकार दिला होता. मात्र, त्याच्या आईने कुटुंबीयांची समजूत घातल्याने त्याला केपीएस भिलाई शाळेत दाखल करण्यात आले. तेथून बारावीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले.

6 महिन्यांच्या फरकाने झाला दोन काकांचा मृत्यू तरी...

नम्रता 8वीत असताना त्यांच्या शाळेतील कोणत्यातरी कार्यक्रमात भाषण देण्यासाठी जिल्हाधिकारी आले होते. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना आयएएस अधिकाऱ्यांच्या अधिकारांबद्दल सांगितले. यूपीएससी परीक्षेच्या तयारीदरम्यान, नम्रता यांच्या दोन काकांचा 6 महिन्यांच्या फरकाने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे त्या आतून त्या खूप तुटल्या होत्या. मात्र, नंतर काकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दुप्पट मेहनत करून तयारी करू लागल्या. या काळात त्यांच्या आईने त्याला पूर्ण पाठिंबा दिला.

हेही वाचा - Success Story : IIT पास, UPSC मध्ये दुसरा क्रमांक, शेतकऱ्याची मुलगी झाली IAS अधिकारी

नम्रता जैन यांनी 2015 मध्ये यूपीएससीची पहिली परीक्षा दिली होती, यामध्ये त्या नापास झाल्या होत्या. त्यानंतर 2016 मध्ये त्या 99वी रँक मिळवून मध्य प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकारी बनल्या. पण त्यांना आपल्या स्वप्नाशी तडजोड नाही केली. यानंतर 2018 मध्ये, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ऑल इंडिया रँक 12 वा क्रम प्राप्त करत त्यांनी IAS सेवेला गवसणी घातली.

यानंतर IAS नम्रता जैन यांनी 16 सप्टेंबर 2020 रोजी छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात तैनात IPS निखिल राखेचा यांच्याशी विवाह केला. या दोघांच्या विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील अनेक अधिकारी सहभागी झाले होते. 2019 मध्ये ट्रेनिंग दरम्यान या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली होती, असे सांगितले जाते.

First published:

Tags: Career, Chhattisgarh, Ias officer, Inspiring story, Success story, Upsc