जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Paytm युझर्ससाठी सुवर्णसंधी! घरबसल्या मिळवा 2 लाख; समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Paytm युझर्ससाठी सुवर्णसंधी! घरबसल्या मिळवा 2 लाख; समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Paytm युझर्ससाठी सुवर्णसंधी! घरबसल्या मिळवा 2 लाख; समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पेटीएमने (Paytm) आपल्या ग्राहकांसाठी उत्तम अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 एप्रिल : सध्या बहुतेक जण मोबाइल पेमेंट अ‍ॅपचा वापर करतात. अशाच पेमेंट अ‍ॅपपैकी (Paytm app) एक म्हणजे Paytm. तुम्हीसुद्धा पेटीएम अ‍ॅप वापरता का? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही पेटीएमचा वापर करत असाल तर तुम्हाला घरबसल्या 2 लाख मिळू शकतात. पेटीएमने आपल्या युझर्ससाठी ही उत्तम अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पेटीएम आपल्या ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंतच कर्ज (Loan) देत आहे. पेटीएमने नुकतीच इंस्टेंट पर्सन लोन सर्व्हिस (Personal loan) सुरू केली आहे. त्यामार्फत अवघ्या काही मिनिटांतच घरबसल्या तुम्ही लोन घेऊ शकतात. आता कर्ज म्हटलं की बरीच कामं आली. पण पेटीमएमवरून कर्ज घेण्यासाठी तुम्हालाही फार अडचणही येणार नाही. तुम्हाला काही जास्त डॉक्युमेंट्स लागणार नाही. अगदी साध्यासोप्या अटींसह तुम्हाला पेटीएम कर्ज देत आहे.  लोन घेण्याच्या प्रक्रियेला कंपनीने डिजीटल केलं आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेत जाऊन दस्तावेज जमा करण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही घरातूनच मोबाईलमार्फत लोनसाठी अर्ज करू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दोन मिनिटांची आहे आणि काही मिनिटांतच पैसे तुमच्या अकाऊंटमद्ये येतील. हे वाचा -  कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार देणार 5000 रु.; तुम्हाला करावं लागेल फक्त एक काम पेटीएममार्फत इंस्टंट पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला  Paytm app वर जाऊन फायनान्शिअल सर्व्हिस ऑप्शनमध्ये पर्सनल लोनच्या टॅबवर क्लिक करावं लागेल. तिथं तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही लोनसाठी पात्र आहात ही की नाही हे तापसलं जाईल आणि तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम ट्रान्सफर केली जाईल. हे वाचा -  Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत 10000 रुपयांची घसरण; वाचा आजचा भाव पेटीएमने आपल्या 400 पेक्षा अधिक ग्राहकांना पर्सनल लोन दिलंसुदधा आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत तब्बल 10 लाख लोकांना लोन देण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात