नोकरी शोधताना होऊ शकते फसवणूक, वापरा 'या' सोप्या 5 टिप्स

नोकरी शोधताना होऊ शकते फसवणूक, वापरा 'या' सोप्या 5 टिप्स

नोकरी शोधण्याच्या नादात आपण अनेक वेळा त्याची सत्यता पडताळत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते.

  • Share this:

मुंबई, 02 फेब्रुवारी: आपल्याला नोकरीची तातडीनं गरज असते अशावेळी एकादी संधी समोरून आली तर ती कोणताही विचार न करता आपण स्वीकारतो. मात्र ती नोकरी खरंच आपल्याला मिळणार आहे की आपण फसवले जाणार आहोत याचा कोणताही अंदाज आपल्याला येत नाही. अनेक वेळा आपल्याला फोनवर किंवा SMS द्वारे नोकरीसाठी विचारलं जातं. त्यानंतर कन्फर्म नोकरी देण्याचं आश्वासन दिलं जातं. बेरोजगार असल्याचा फायदा घेऊन किंवा आपल्याला अधिक चांगला पगार हवा म्हणून नोकरी बदलण्याच्या नादात आपली खूप मोठी फसवणूक केली जाऊ शकते याची जराही कल्पना आपल्याला येत नाही. अशा खोट्या आणि फसव्या संधीपासून सावध कसं राहायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1.बऱ्याचवेळा आपल्याला नोकरीचे फोन किंवा कोणतीही परीक्षा न घेता नोकरीची ऑफर दिली जाते. यासाठी आधी तुम्हाला काही रक्कम भरण्यासाठी सांगितली जाते आणि पहिला पगार आल्यानंतर ती रक्कम रिफंड होईल याचं आश्वासन दिलं जातं. अशांपासून सावध राहा

2.याशिवाय बऱ्याचवेळा तुमची कॉम्फिडेन्शल माहिती विचारली जाते. बँकेचे डिटेल्स, क्रेडिटकार्ड, OTP, आधार, पॅन कार्ड यांसंबधीत माहिती विचारली जाते.

3.फसव्या जाहिरातींचं लिखाण करताना त्यामध्ये चुका असतात. इंग्रजी जाहिरातींमध्ये व्याकरणाच्या चुकाही असतात.

4.तुम्हाला मुलाखतीला बोलवून लगेच हातात ऑफर लेटर दिलं जातं किंवा अनेकदा मुलाखत न घेताच पैसे भरा ऑफर लेटर घ्या असंही सांगितलं जातं.

5.अपेक्षेपेक्षा जास्त पगार ऑफर केला जातो. याशिवाय ऑनलाईन पोर्टलवरून जर तुम्ही नोकरीसाठी अर्ज भरत असाल तर त्या पोर्टलची खात्री करून घ्यावी. बऱ्याचदा त्या पोर्टलचं नावही चुकीचं किंवा फसवं असू शकतं.

हेही वाचा-चांगले गुण मिळवण्यासाठी पेपर सोडवताना वापरा या सोप्या ट्रिक्स

आपली फसवणूक होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी?

1.तुम्हाला आलेल्या नोकरीच्या ऑफरची सत्यता पडताळणं गरजेचं आहे.

2.कोणत्याही परिस्थित तुमचं बँक खातं किंवा त्यासंबंधीत डिटेल्स कोणत्याही व्यक्तीला अथवा मुलाखतीनंतर देऊ नका.

3.नोकरीसाठी तुम्हाला पैसे भरावे लागत असतील तर ती नोकरी स्वीकारू नका.

4.ज्या संस्थेकडून तुमची निवड केली जाणार आहे. त्याबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे.

5.फसव्या जाहिराती आणि नोकरीच्या येणाऱ्या संधीपासून सावध राहा.

हेही वाचा-Post Graduate उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरीची संधी

First published: February 2, 2020, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading