मार्च एण्डिंग आलं... ऑफिसमध्ये जाणारे नोकरदार नसाल तरी पाहाच हा मजेदार VIDEO

मार्च एण्डिंग आलं... ऑफिसमध्ये जाणारे नोकरदार नसाल तरी पाहाच हा मजेदार VIDEO

मार्चअखेरी (March Ending) ऑफिसमधलं वातावरण एकदम एनर्जेटिक असतं. अप्रेजल्स जवळ येतात आणि कर्मचाऱ्यांची धांदल सुरू होते. IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला हा व्हिडीओ मजेदार आहेच, सोबतच त्यावरची कमेंट अजूनच भन्नाट आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज वेळोवेळी व्हायरल होत असतात. कधी हे भावनिक करतात, कधी डोळ्यात पाणी आणतात तर कधी एकदमच खळखळून हसायला भाग पाडतात. (viral video) आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. सध्या सुरू असलेल्या मार्च महिन्याची किनार या VIDEO ला आहे. या व्हिडिओत आपल्याला काही वादक आणि गायक दिसतात. हे सगळेच एका ओळीत आणि सारख्याच कपड्यांमध्ये बसलेले आहेत. (IAS Awanish Sharan viral video)

मार्चमध्ये सर्व नोकरदार कर्मचाऱ्यांचं अप्रायझल होत असतं. हे अप्रायझल चांगलं व्हावं यासाठी सर्वच कर्मचारी एकदम जोमात काम करतात. सोशल मीडियावर याबाबत अनेक मिम्स, विनोदही वाचायला मिळतात. आता एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही खूप हसाल यात शंका नाही. (March ending funny video)

हेही वाचा VIDEO: बाईक स्टंट करत रोमान्स करणं पडलं महागात, कारवाईनंतर कपलनं मागितली माफी

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटरवर एक गमतीदार कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतले वादक आणि गायक सगळे एका ओळीत आणि सारख्याच कपड्यांमध्ये बसलेले आहेत. सगळेजण एकदमच वेगवान शैलीत वाद्य वाजवत आहेत. (IAS Awanish Sharan shares music artists video)

या वादकांची ही स्टाईल पाहून अवनीश यांना आठवले मार्च एंडिंगला कार्यालयात काम करणारे कर्मचारी! (music artists funny viral video)

हेही वाचा VIDEO: रस्त्यावर भन्नाट लावणी करणाऱ्या बारामतीच्या रिक्षाचालकाला सिनेमांची ऑफर

आपलं अप्रायझल चांगलं व्हावं यासाठी हे कर्मचारी अतिशय चांगलं, मनापासून काम करतात.हे वादकही तसेच आहेत अशी कमेंट शरण यांनी केली. यावर अनेकांना हसू आलं.

याशिवाय अजून एकानं हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, की जिरे तेलात टाकल्यावर हे असेच तडतड करतात. या व्हिडिओवर युजर्सही एकाहून एक भन्नाट कमेंट्स करताना दिसतात.

Published by: News18 Desk
First published: March 14, 2021, 8:13 AM IST

ताज्या बातम्या