मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बारामतीच्या रस्त्यावरच्या त्या VIRAL VIDEO ने नशीब पालटलं! लावणीसम्राट रिक्षाचालकाला मिळाल्या सिनेमांच्या ऑफर

बारामतीच्या रस्त्यावरच्या त्या VIRAL VIDEO ने नशीब पालटलं! लावणीसम्राट रिक्षाचालकाला मिळाल्या सिनेमांच्या ऑफर

'मला जाऊ द्या ना घरी'  गाण्यावर शेकडो नृत्यांगनांनी आतापर्यंत लावणी बसवली असेल. पण एका पुरुषाच्या लावणीनृत्यावर जग फिदा झालं आहे. VIRAL झालेल्या हा रिक्षास्टँडवरचा VIDEO पाहून चक्क रिक्षाचालकाला दोन सिनेमे ऑफर झाले आहेत.

बारामती, 12 मार्च:बारामती तालुक्यातल्या गुनवडी गावात सामान्य परिस्थितीत राहणारे रिक्षाचालक बाबाजी कांबळेंचं आयुष्य एका VIRAL VIDEO ने पूर्ण बदलणार आहे. (Baramati Auto driver dance video) बाबाजींनी मित्रांच्या आग्रहाखातर आपली नृत्यकला त्या दिवशी रिक्षास्टँडवरच दाखवली. कुणी तरी एकाने मोबाईलवर त्यांची ही भन्नाट लावणी रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. पाहता पाहता या व्हिडीओचे लाइक्स वाढले. इतके की याची दखल बहुतेक सगळ्याच माध्यमांनी घेतली. एवढंच नाही तर 'आता वाजले की बारा' (Ata wajale ki bara lavni song) या नटरंग चित्रपटातल्या लावणीवर जिची पावलं थिरकली त्या अमृता खानविलकरनही बाबाजींचा VIDEO पाहून (Viral video baramati rikshaw driver lavni) कौतुक केलं. अखेर या लोककलाकाराच्या कलेचं चीज झालं. त्याला चक्क दोन मराठी चित्रपटांची ऑफर मिळाली आहे.

बारामती (Baramati) एका रिक्षा चालकाच्या VIRAL VIDEO वर जमाना फिदा कसा झाला आणि का झाला हे जाणून घ्यायला आधी तुम्हाला हा VIDEO पाहावाच लागेल. अगदी कुठल्याही मेकअप, साडी, साथीदारांशिवाय निव्वळ मोबाईलवर वाजणाऱ्या गाण्यावर रस्त्यात उभं राहून बाबाजी कांबळेंची पावलं अशी काही थिरकली आहेत आणि ज्या नजाकतीने त्यांनी लावणी पेश केली आहे त्याला तोड नाही. अगदी मुरडत केलेल्या अभिनयासह त्यांनी मनापासून हे नृत्य केलेलं आहे.

" isDesktop="true" id="530125" >

बाबाजी कांबळे यांच्या या कौशल्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते घनश्याम येडे यांनी आपल्या आगामी चित्रपटांमध्ये काम करशील का अस विचारलं आहे. याबाबत 'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार घनश्याम येडे यांनी सोशल मीडियावरच हा व्हीडिओ पाहिला होता.

दगड खाणारे आजोबा! दररोज 250 ग्रॅम खडे खाऊन दूर केला हा आजार

त्यानंतर बाबाजींची चौकशी करत ते बारामतीत पोहोचले. त्यांची भेट घेतली आणि थेट चित्रपट ऑफर केले. चल रे फौजी आणि कवच अशा दोन सिनेमांमध्ये बाबाजी कांबळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Baramati, Dance video, Video viral