मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: बाईक स्टंट करत रोमान्स करणं कपलला पडलं महागात, व्हिडीओ शेअर करत मागितली माफी

VIDEO: बाईक स्टंट करत रोमान्स करणं कपलला पडलं महागात, व्हिडीओ शेअर करत मागितली माफी

या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी चालत्या बाईकवर स्टंट (Bike Stunt) करत रोमान्स करताना दिसत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता या कपलनं सोशल मीडियावर आपल्या चुकीसाठी माफी मागितली आहे.

सूरत 13 मार्च : बाईकवरील स्टंटचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. असाच एक सूरतमधील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी चालत्या बाईकवर स्टंट (Bike Stunt) करत रोमान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सूरतच्या पाल भागातील आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलिसांनी कपलविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता या कपलनं सोशल मीडियावर आपल्या चुकीसाठी माफी मागितली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सहा दिवसाआधी बनवला गेला होता. या व्हिडीओमध्ये अब्दुल रहमान मोहम्मद इम्तियाज हा तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत दुचाकीवर फिरत होता. पोलिसांनी रस्त्यावर बाईक स्टंट केल्याप्रकरणी रहमानविरोधात कलम 279 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडून दंडही वसूल केला आहे. आता त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

रहमान बीकॉमचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर त्यानं आपल्या या बाईक स्टंटसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे. रहमान या व्हिडीओमध्ये म्हणतं आहे, की मला नाही माहिती, मी काय चुकीचं केलं . मात्र, मला हे मान्य आहे, की विना हेल्मेट अशाप्रकारचा स्टंट नाही करायला पाहिजे. रहमान पुढे म्हणाला, की मला नाही माहिती आमच्याविरोधात कोणी तक्रार केली. मात्र, मी त्या व्यक्तीचे आभार मानतो. ज्याच्या तक्रारीमुळे मला माझी चूक समजली. रहमान म्हणाला, नकळत मी हे जे काही केलं, त्यासाठी मी माफी मागतो. तुम्हीदेखील दुचाकी चालवत असाल, तर मास्क आणि हेल्मेट नक्की वापरा.

First published:
top videos

    Tags: Love, Police action, Relationship, Viral video.