मुंबई, 14 मार्च: एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये वेगानं वाढ होत आहे. त्यामुळे एअर होस्टेसची (हवाई सुंदरी) मागणीही वाढत आहे. तसंही पूर्वीपासूनच एअर होस्टेसच्या नोकरीनं हजारो मुलींना आपल्याकडे आकर्षित केलेलं आहे. कारण, एअर होस्टेस ही केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर पगाराच्या दृष्टीनेही उत्तम नोकरी आहे. एअर होस्टेस होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि त्यांना किती पगार मिळतो, याबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. कोण बनू शकतं एअर होस्टेस? एअर होस्टेस होण्यासाठी इच्छुक उमेदवारानं किमान इंटरमिजिएट (इयत्ता 12वी) परीक्षा पास केलेली असावी किंवा एव्हिएशनमध्ये पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे. या शिवाय एअर होस्टेस ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतलेलं पाहिजे. एअर होस्टेस होण्यासाठी काही फिजिकल स्टँडर्डदेखील निश्चित केलेली आहेत. इच्छुक उमेदवाराची उंची किमान पाच फूट 2 इंच असली पाहिजे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणंदेखील महत्त्वाचं आहे. नोकरीसाठी अर्ज करताना 17 ते 26 वर्षांदरम्यान वय असलं पाहिजे. तसंच अर्ज करतेवेळी संबंधित व्यक्ती अविवाहित असणं गरजेचं आहे. Career Tips: CBI मध्ये अधिकारी होण्यासाठी पात्रता असते तरी काय? किती मिळतो पगार? संपूर्ण माहिती एअर होस्टेसचं सिलेक्शन कसं होतं? एअर होस्टेस पदाच्या भरतीसाठी एअरलाइन्स कंपन्या जाहिराती देतात. लेखी चाचणी, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एअर होस्टेस होण्यासाठी ‘हा’ कोर्स करू शकता एअर होस्टेस होण्यासाठी सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करता येतो. हे अभ्यासक्रम बारावीनंतर पूर्ण करता येतात. प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने ते एक वर्षाचा असू शकतो. तर, डिग्री अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचा असतो. महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार आणि कोणतीही परीक्षा नाही; उद्या शेवटची तारीख; इथे करा अप्लाय एअर होस्टेसना किती पगार मिळतो? नवीन एअर होस्टेसना सुरुवातीला सरासरी चार ते पाच लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. पण, जसजसा अनुभव वाढत जातो तसतसा एक एअर होस्टेस 13 ते 15 लाख रुपयांपर्यंत पगार घेते. JOB ALERT: ‘या’ प्रसिद्ध वुमन्स कॉलेजमध्ये प्रोफेसर पदांसाठी ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? करा चेक एअर होस्टेसच्या जबाबदाऱ्या 1. प्रवाशांचं स्वागत करणं आणि उड्डाणपूर्व ब्रीफिंगमध्ये त्यांना त्यांच्या जागेवर बसण्यासाठी मार्गदर्शन करणं. 2. उड्डाणादरम्यान प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरं देणं. 3. प्रवाशांना अन्न आणि पाणी पुरवणं. 4. उड्डाणाचा अहवाल तयार करणं. 5. गरज पडल्यास प्रवाशांना वैद्यकीय सेवा पुरवणं. 6. प्रवाशांना सुरक्षा प्रक्रियेबद्दल सूचना देणं
सतत प्रवासाची आणि इतरांची मदत करण्याची आवड असलेल्या मुलींसाठी एअर होस्टेसची नोकरी, हा करिअर करण्यासाठी चांगला पर्याय आहे. भारतामध्ये एअर इंडिया, स्पाईट जेट, इंडिगो आणि किंगफिशर यासारख्या विमान कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी मिळू शकते.