Home /News /career /

Government Job: सरकारी नोकरीची संधी; 9000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या डिटेल्स

Government Job: सरकारी नोकरीची संधी; 9000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या डिटेल्स

बँक, 12वी पास, 10वी पास, मेट्रो, इंडियन ऑईल यांसारख्या अनेक ठिकाणी रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. अनेक सरकारी विभागांमध्ये भरती सुरू आहे. बँक, 12वी पास, 10वी पास, मेट्रो, इंडियन ऑईल यांसारख्या अनेक ठिकाणी रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. कॅनरा बँक (Canara Bank) - कॅनरा बँकेत (Canara Bank Recruitment) स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी व्हॅकेन्सी आहे. या भरतीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कॅनरा बँकेच्या अधिकृत canarabank.com वेबसाईटवर भेट देऊ शकता. या पदांसाठी 15 डिसेंबर 2020 पूर्वी अर्ज करावा लागेल. या पदांसाठी निवड ऑनलाईन परीक्षेआधारे होणार आहे. संपूर्ण डिटेल्ससाठी येथे क्लिक करा. एसबीआय (SBI) - भारतीय स्टेट बँकने देशभरातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अप्रेंटिससाठी 8500 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटsbi.co.in वर अर्ज करता येऊ शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर आहे. येथे पाहा संपूर्ण डिटेल्स इंडियन ऑईल - इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Limited, IOCL) 436 अप्रेंटिस पदांसाठी व्हॅकेन्सी आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट iocl.com वर अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 आहे. येथे करा अर्ज.

  (वाचा - नोकरदार वर्गाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा; अनेक नियमांमध्ये होणार बदल)

  एनसीआरसीटीसी - नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये, ज्यूनियर इंजिनियरच्या 52 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.ncrtc.in 2020 वर अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 डिसेंबर आहे. येथे क्लिक करा. दिल्ली मेट्रो - दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये असिस्टेंट मॅनेजर पदासाठी भरती सुरू आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईट delhimetrorail.com च्या माध्यमातून अर्ज करता येईल.

  (वाचा - आता 8 नाही तर 12 तासांची होऊ शकते शिफ्ट, सरकारनं संसदेत मांडला प्रस्ताव)

  वल्लभभाई पटेल इन्स्टिट्यूट - वल्लभभाई पटेल इन्स्टिट्यूट, दिल्ली विद्यापिठात अनेक पदांसाठी नोकरीची संधी आहे. त्यासाठी 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. उमेदवार vpci.org.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. 12वी पास - भारतीय सांख्यिकी संस्था (आयएसआय) कोलकातामध्ये नोकरीची चांगली संधी आहे. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी भरती सुरू आहे. 23 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे.

  (वाचा - खूशखबर! फेब्रुवारीपर्यंत 5000 रुपयांपर्यंत स्वस्त होणार सोनं, जाणून घ्या काय आहे कारण)

  सचिवालय - Cabinet Secretariat Recruitment 2020 कॅबिनेट सचिवालयमध्ये फिल्ड असिस्टेंट पदांसाठी भरती आहे. ही भरती केंद्र सरकारच्या संस्थेत भाषेच्या आधारे होईल. उमेदवार अपेक्षित फॉर्मेटमध्ये 31 डिसेंबर 2020 पूर्वी अर्ज करू शकतात. 10वी पास - इंडियन कोस्ट गार्डमध्ये डोमेस्टिक ब्रँच - कुक आणि स्टीवार्ड पदांसाठी भरती आहे. ही भरती संरक्षण मंत्रालयांतर्गत निघाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Sarkari Naukari

  पुढील बातम्या