Home /News /money /

खूशखबर! फेब्रुवारीपर्यंत 5000 रुपयांपर्यंत स्वस्त होणार सोनं, जाणून घ्या काय आहे कारण

खूशखबर! फेब्रुवारीपर्यंत 5000 रुपयांपर्यंत स्वस्त होणार सोनं, जाणून घ्या काय आहे कारण

गुंतवणूकदारांसाठी सोनं सुरक्षित गुंतवणूक ठरत आहे. जोखमीच्या काळात सोनं गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरतो आहे. पण आता सोन्याच्या किंमतीत घसरण होते आहे. ऑगस्टनंतर आतापर्यंत सोनं जवळपास 6000 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झालं आहे.

  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : यंदाच्या वर्षात मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात दहशतीचं वातावरण आहे. अशात गुंतवणूकदारांसाठी सोनं सुरक्षित गुंतवणूक ठरत आहे. जोखमीच्या काळात सोनं गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरतो आहे. पण आता सोन्याच्या किंमतीत घसरण होते आहे. अमेरिकन डॉलर आणि कोरोना वॅक्सिनच्या बातम्यांमुळे सोन्या-चांदीचे दर घसरत आहेत. ऑगस्टनंतर आतापर्यंत सोनं जवळपास 6000 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झालं आहे. कोरोनावरील प्रभावी वॅक्सिन लवकरच येण्याच्या बातम्यांमुळे आता सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1000 रुपयांपर्यंत आणखी खाली आले आहेत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीतील घसरण अशीच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नव्या वर्षापर्यंत सध्याच्या किंमतीपेक्षा सोन्याचे दर 5000 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त होऊ शकतात. (वाचा - 10 हजारांच्या गुंतवणुकीतून मिळणार 16 लाखांचा फायदा, काय आहे ही स्किम जाणून घ्या) अमेरिकन Pfizer कंपनीने दावा केला आहे की, वॅक्सिन तिसऱ्या ट्रायलमध्ये 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी झालं आहे. त्यांनी तयार केलेलं वॅक्सिन 94.5 टक्के प्रभावी असल्याचंही सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय सीरम इन्स्टिट्यूटनेही, भारतात वॅक्सिन 3 ते 4 महिन्यात उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने, वॅक्सिन 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. ऑक्सफोर्डच्या वॅक्सिन प्रोजेक्टमध्ये सीरम इन्स्टिट्यूटही पार्टनर आहे. एसकोर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इक्बाल यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, कोरोना वॅक्सिनबाबत आलेल्या चांगल्या माहितीमुळे सोन्या-चांदीच्या दरात सतत घसरण होत आहे. आगामी काळातही सोन्याच्या किंमतीत घसरण होऊ शकत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पुढच्या वर्षात वॅक्सिन लॉन्च झाल्यास, एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या किंमती 45000 पर्यंत येऊ शकतात, असंही ते म्हणाले.

  (वाचा - आता चीनमधून येणाऱ्या खराब इलेक्ट्रॉनिक सामानावर बंदी; सरकारने उचललं हे पाऊल)

  शॉर्ट टर्ममध्ये सोन्याच्या किंमतीत घसरणीची शक्यता आहे. कोरोना वॅक्सिन बाजारात उपलब्ध झाल्यास, सोन्याचे दर बाजारात 48000 रुपयांहून खाली येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Gold, Gold and silver prices today

  पुढील बातम्या