नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : बँक जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. कॅनरा बँकने (Canara Bank Recruitment) स्केल-1 आणि स्केल-2 मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसरच्या रिक्त जागांसाठी व्हॅकेन्सी जारी केली आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईट canarabank.com वर 25 नोव्हेंबरपासून पाहू शकता. इच्छुक आणि योग्य उमेदवार कॅनरा बँक रिक्रूटमेंट 2020 साठी, 15 डिसेंबर 2020 पूर्वी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया केली जाईल. ऑनलाईन परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे.
अर्ज करण्याची तारीख - 25 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 डिसेंबर 2020
ऑनलाईन परीक्षेची तारीख - जानेवारी/फेब्रुवारी 2021
असा करा अर्ज -
उमेदवार कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही. याअंतर्गत उमेदवार केवळ एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.
(वाचा - बापरे! 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटातून काढली 3 फूट लांब गाठ; डॉक्टरही हैराण)
पात्रता -
उमेदवाराला कम्प्यूटर ऑपरेटिंग आणि वर्किंग नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याशिवाय अर्ज करणाऱ्याला हिंदीचं ज्ञान असणंही आवश्यक आहे.
(वाचा - whatsapp वर डिलीट झालेले फोटो असे करा डाउनलोड; जाणून घ्या सोपी ट्रिक
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेलं नोटिफिकेशन वाचूनच पुढील अर्ज भरावा. नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा.