Home /News /money /

महत्त्वाची बातमी! आता 8 नाही तर 12 तासांची होऊ शकते शिफ्ट, सरकारनं संसदेत मांडला प्रस्ताव

महत्त्वाची बातमी! आता 8 नाही तर 12 तासांची होऊ शकते शिफ्ट, सरकारनं संसदेत मांडला प्रस्ताव

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटीबाबतच्या कोड 2020 मसुद्याच्या नियमांनुसार दररोज कामाची वेळ 12 तासांची करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयानं दिला आहे.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : आता नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात अधिक वेळ काम करण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. कारण सध्याच्या दररोज कामाच्या आठ तासांवरून ते 12 तास करण्याचा सरकार विचार करत आहे. कामगार मंत्रालयानं संसदेत नुकताच याबाबतचा प्रस्ताव मांडला आहे. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटीबाबतच्या कोड 2020 मसुद्याच्या नियमांनुसार दररोज कामाची वेळ 12 तासांची करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयानं दिला आहे. यामध्ये मधल्या वेळेच्या सुट्टीचाही समावेश आहे. 19 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या या ड्राफ्ट रुलनुसार, आठवड्यातील एकूण कामांचे तास मात्र पूर्वीप्रमाणेच 48 तासच ठेवण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार आठवड्यातील सहा दिवस दररोज कामाचे आठ तास असतात, तर एक दिवस सुट्टी असते. वाचा-10 हजारहून अधिक लोकांना मिळणार नोकरी, क्रेंद सरकारनं उचललं मोठं पाऊल कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम मिळणार कामगार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘देशातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वातावरणाचा विचार करून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पूर्ण दिवसभर कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईमच्या माध्यामातून अधिक कमाई करण्याची संधी मिळेल.’ ‘आठ तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम मिळेल, अशी तरतूद ड्राफ्ट रूलमध्ये करण्यात आली आहे’, असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ओएसएच कोडच्या ड्राफ्ट रूलनुसार, दिवसातील ओव्हरटाईम मोजताना तो 15 ते 30 मिनिटांदरम्यान असेल तर तो 30 मिनिटे गृहीत धरला जाईल. सध्या तीस मिनिटांपेक्षा कमी वेळ ओव्हरटाईम असेल तर तो गृहीत धरला जात नाही. वाचा-10 हजारहून अधिक लोकांना मिळणार नोकरी, क्रेंद सरकारनं उचललं मोठं पाऊल एका आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम नाही ड्राफ्ट रुलनुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याला एका आठवड्यात 48 तासांपेक्षा अधिक वेळ काम करण्याची गरज नाही, आणि तशी परवानगीही दिली जाणार नाही. कामाचे नियोजन अशा पद्धतीने केले पाहिजे की दररोज मधल्या सुट्टीच्या वेळेसह कामाचे तास 12 तासांपेक्षा जास्त होता नयेत. नव्याने देण्यात आलेल्या ड्राफ्ट रूलनुसार, कोणीही व्यक्ती किमान अर्ध्या तासाच्या मधल्या सुट्टीशिवाय सलग पाच तासांपेक्षा अधिक वेळ काम करणार नाही. म्हणजेच सलग पाच तासांनंतर किमान अर्धा तास सुट्टी घेणे आवश्यक आहे. तसेच या हिशेबाने, आठवड्यातील एकूण कामाचे तास 48 तासांपेक्षा जास्त होणार नाहीत, अशा पद्धतीने नियोजन करणे अपेक्षित आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या