मुंबई, 06 ऑक्टोबर: जगभरातील कोट्यवधी लोकांच्या रोजच्या जगण्याचं ज्या कंपनीला गवसलं आहे अशा Google कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी (Freshers Jobs in Google) सर्वात मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. Google कडून Off Campus Drive ची घोषणा करण्यात आली आहे. Internet, Software, Computer Hardware या इंडस्ट्रीसाठी ही भरती असणार आहे. या Off Campus Drive साठी (Google off campus drive 2021) उमेदवारांसाठी काय निकष असणार आहेत आणि यासाठी अप्लाय (How to Apply for Google off campus drive) कसं करणार याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. या पदांसाठी भरती Internet, Software, Computer Hardware या विभागांशी संबंधित जागांसाठी हे भरती असणार आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यासाठी उमेदवारांनी BE, B.Tech, MBA, MCA, ME, M.Tech यामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 2022, 2021, 2020 या वर्षी पास आउट असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. संबंधित पदांसाठी गरजेचं असलेले सर्व स्किल्स उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे. उमेदवारांना Google in assertions talks ला संबोधित करता येणं आवश्यक आहे. कंपनीच्या फायद्यासाठी उमेदवारांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे वाचा - Siemens Recruitment: Siemens कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी मोठी सुवर्णसंधी अशा पद्धतीनं होणार उमेदवारांची निवड Google या पदभरतीसाठी विविध राउंड्समध्ये मुलाखत घेणार आहे. Aptitude written test online, Technical interview त्यानंतर HR interview अशा पद्धतीनं उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या कागदपत्रांची असणारा आवश्यकता Resume एसएससी मार्कशीट एचएससी/ डिप्लोमा मार्कशीट पदवी आणि पदव्युत्तर (सर्व वर्षे) गुणपत्रिका कोणताही फोटो आयडी पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / कॉलेज आयडी) फोटो अशा पद्धतीनं करा अप्लाय Google च्या www.google.com च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा. यानंतर “Register here” लिंकवर क्लिक करा. Google Off Campus 2021 हा अप्लिकेशन फॉर्म निवडा. Google Application Form 2021 भरा. यानंतर Submit बटणवर क्लिक करा आणि फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. हे वाचा - IBPS Clerk Recruitment: IBPS मार्फत क्लर्कच्या तब्बल 5830+ जागांसाठी होणार भरती मुलाखतीचा पत्ता Google India Pvt. Ltd, Block 1, DivyaSree Omega, Survey No. 13, Kondapur Village, Hyderabad, Telangana, India. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.google.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.