Home /News /career /

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? एका क्लिकमध्ये वाचा या आठवड्यात कुठे अर्ज करता येईल

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? एका क्लिकमध्ये वाचा या आठवड्यात कुठे अर्ज करता येईल

सरकारी नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. शास्त्रज्ञ, बँकिंग पर्सोनेलपासून भारतीय लष्करापर्यंतच्या विविध क्षेत्रांतल्या सरकारी नोकऱ्यांच्या जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.

नवी दिल्ली, 15 जून: सरकारी नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. शास्त्रज्ञ, बँकिंग पर्सोनेलपासून भारतीय लष्करापर्यंतच्या विविध क्षेत्रांतल्या सरकारी नोकऱ्यांच्या जागांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. तुम्हाला शोधणं सोपं व्हावं म्हणून news18.comने ताज्या सरकारी नोकऱ्यांची माहिती इथे प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी तुम्ही तातडीने अर्ज करू शकता. BIS सायंटिस्ट B साठी रिक्रूटमेंट (BIS Scientist B Recruitment 2021) 'दी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'ने (Bureau of Indian Standards) इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्ससाठी सायंटिस्ट बी या पदावर भरती जाहीर केली आहे. 28 जागा उपलब्ध असून, 25 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. BIS च्या ऑफिशियल वेबसाइटद्वारे अर्ज करता येणार आहे. HSSC पोलीस काँस्टेबल्स (HSSC Police Constables Recruitment 2021 ) हरयाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनने पोलीस खात्याच्या कमांडो विंगमध्ये (ग्रुप सी) पुरुष कॉन्स्टेबल्सच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 520 पदं भरायची आहेत. किमान 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. 14 जूननंतर यासाठी अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल. UPSC NDA II युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (UPSC) नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी परीक्षेसाठी अर्ज मागवले आहेत. 29 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. पाच सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. हे वाचा-नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; एक लाखापर्यंत मिळणार वेतन! कसा, कुठे करायचा अर्ज? IBPS RRB PO, क्लार्क रिक्रूटमेंट (IBPS RRB PO, Clerk Recruitment 2021) इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने रीजनल रुरल बँक्समध्ये स्केल वन, टू, थ्री आणि ऑफिस असिस्टंट या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आठ जूनला सुरू झाली असून, 28 जूनला संपणार आहे. प्री-एक्झाम ट्रेनिंग टेस्ट 19 ते 25 जुलै या कालावधीत होणार आहे. DRDO Apprentice डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) जोधपूर कार्यालयात अप्रेटिंस पदासाठी अर्ज मागवले आहेत. 47 पदं रिक्त आहेत. अर्ज करण्याची शेवटची मुदत 20 जून आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी ऑफिशियल वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून घेणं आवश्यक आहे. हे वाचा-नारायण मूर्ती-Amazon ची संयुक्त कंपनी कर विवादात, भरावं लागणार कोट्यवधींचं शुल्क BCECEB बिहार कंबाइन्ड एंट्रन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन बोर्डाने (BCECEB) राज्यभरातली विविध मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्समध्ये सीनिअर रेसिडेंट आणि ट्युटर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या प्रक्रियेतून तब्बल 1797 पदं भरली जाणार आहेत. 20 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. UPSSSC PET उत्तर प्रदेश सबॉर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन कमिशनने (UPSSSC) ग्रुप सी पोस्ट्सकरिता उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रीलिमिनरी एलिजिबिलिटी टेस्टकरिता (PET)ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 21 जूनपर्यंत ऑनवाइन अर्ज सादर करावयाचा आहे. भारतीय लष्कर SSC-Tech भारतीय लष्कराने त्यांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अविवाहित स्त्री-पुरुष इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्सकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार 23 जूनपूर्वी ऑफिशियल पोर्टलवरून अर्ज करू शकतात. पुरुष उमेदवारांसाठी 175, तर स्त्रियांसाठी 14 जागा रिक्त आहेत. रेल्वे पश्चिम रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने 3591 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या अधिकृत वेबसाइटवर 24 जूनपर्यंत अर्ज करता येऊ शकतात. ही थेट भरती मोहीम आहे. यासाठी परीक्षा होणार नाही. HPPSC असिस्टंट इंजिनिअर हिमाचल प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनने (HPPSC) असिस्टंट इंजिनीअर (एक्झिक्युटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल) पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. E-2 पातळीवरची ही पदं काँट्रॅक्ट बेसिसवर आहेत. पात्र उमेदवार 25 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. एकूण सहा पदं रिक्त आहेत. UPRVUNL JE उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडने (UPRVUNL) ज्युनियर इंजिनीअर (ट्रेनी) या पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार दोन जुलैपूर्वी अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. एकूण 196 पदं भरली जाणार आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Railway jobs

पुढील बातम्या