मराठी बातम्या /बातम्या /करिअर /नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; एक लाखापर्यंत मिळणार वेतन! कसा, कुठे करायचा अर्ज?

नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; एक लाखापर्यंत मिळणार वेतन! कसा, कुठे करायचा अर्ज?

नौदल अभिविन्यास पाठ्यक्रम-जानेवारी 2022 (एसटी 22) साठी विविध पदांवरील 50 एसएससी अधिकारी (कार्यकारी शाखा) जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

नौदल अभिविन्यास पाठ्यक्रम-जानेवारी 2022 (एसटी 22) साठी विविध पदांवरील 50 एसएससी अधिकारी (कार्यकारी शाखा) जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

नौदल अभिविन्यास पाठ्यक्रम-जानेवारी 2022 (एसटी 22) साठी विविध पदांवरील 50 एसएससी अधिकारी (कार्यकारी शाखा) जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 14 जून : Indian Navy Recruitment 2021 भारतीय नौदलात B.E./B.Tech उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. नौदल अभिविन्यास पाठ्यक्रम-जानेवारी 2022 (एसटी 22) साठी विविध पदांवरील 50 एसएससी अधिकारी (कार्यकारी शाखा) जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार 26 जूनपर्यंत नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.joinindiannavy.gov.in जावून ऑनलाइन अर्ज करू शकतो.

महत्वाच्या तारखा -

ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख : 12 जून 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 जून 2021

उपलब्ध पदांचा तपशील :

भारतीय नौदलामध्ये एसएससी अधिकाऱ्यांच्या एकूण 50 जागा भरायच्या आहेत. या जागांवर अर्ज करण्यासाठी ब्रँच किंवा केडरप्रमाणे जागांचे विभाजन करण्यात आले आहे.

- एसएससी जनरल सर्विस (GS/X) : 47

- हाइड्रो कॅडर : 03

शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा:

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही विषयात किमान 60 टक्के गुणांसह बीई / बीटेक उत्तीर्ण केलं असलं पाहिजे. उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.

हे वाचा - Success Story: पित्याचं कर्ज फेडण्यासाठी ‘तो’ होता नोकरीच्या शोधात, आता उभी केली 70 हजार कोटींची कंपनी

वेतन स्केल:

भारतीय नौदलात एसएससी अधिकारी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर -10 नुसार 56,100 ते 1,10,700 पगार देण्यात येईल. विशेष म्हणजे अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

First published:
top videos

    Tags: Government employees, Job, Job alert