अजित कुमार
पाटणा, 26 मे : या मुलाचे वडील शेतकरी. घरची परिस्थिती बेताची. वडिलांना मदत म्हणून शेतातली भाजी विकायला हिमांशु बाहेर पडायचा. तरीही मिळणाऱ्या वेळेत नियमित अभ्यास करून त्याने कमाल करून दाखवली. सगळ्या राज्यात पहिला यायचा सन्मान हिमांशु राजला मिळाला. बिहार बोर्डाचा (bihar board online Res)दहावीचा निकाल आज लागला. यानंतर हिमांशुच्या यशाचीच चर्चा सगळीकडे आहे. अशी आहे हिमांशुची प्रेरणादायी गोष्ट...
बिहार बोर्डाचा निकाल 80.59 टक्के लागला. हा आतापर्यंतचा सर्वात चांगला निकाल असल्याचं सांगण्यात येत आहे. संपूर्ण बिहार राज्यातून रोहतास जिल्ह्यातला हिमांशु राज नावाचा मुलगा 96.20 टक्के गुण मिळवून पहिला आला आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा राज्यात पहिला आला. प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने अभ्यास करून त्याने हे यश मिळवलं आहे. कुठलाही क्लास न लावता आणि अभ्यासाबरोबर वडिलांना मदत म्हणून अर्थार्नासाठी हातभार लावत असताना त्यानं हे घवघवीत यश मिळवलं आहे.
हिमांशुला पुढे विज्ञान विषयाचा अभ्यास करायचा आहे. इंजिनीअर व्हायचं त्याचं स्वप्न आहे.
दररोज किती तास करायचा अभ्यास?
हिमांशु अभ्यास मन लावून करायचा. रस घेत अभ्यास केल्याने कमी वेळ अभ्यास करूनही त्यानं मोठं यश मिळवलं. कुठलाही क्लास, वैयक्तिक लक्ष देणारे शिक्षक असं वातावरण नसतानाही तो राज्यात पहिला आला. 6 ते 7 तास तो अभ्यासाला द्यायचा. त्याचं रूटीन कसं असायचं असं त्याला विचारल्यावर हिमांशु म्हणाला, ''रोज सकाळी 10 ते 3 शाळा असायची. घरी आल्यानंतर खाऊन-पिऊन थोडं खेळायला जायचो. किंवा काही काम असेल तर ते करायचो. त्यानंतर मग अभ्यासाला बसायचो. शाळेतून आल्यावर 6 ते 7 तास अभ्यास होईल, असं बघायचो."
हिमांशुच्या घरात आई, वडील, लहान बहीण आणि आजी-आजोबा राहतात. त्याची मोठी बहीण शिकायला दुसऱ्या शहरात असते. ती गेल्या वर्षी 12 वीच्या परीक्षेची टॉपर होती. वडील शेती करतात तर आई घर सांभाळते, असं हिमांशु सांगतो.
--
अन्य बातम्या
Coronavirus : हायड्रोक्सीक्लोरोक्वीनबाबत आरोग्य मंत्रालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश
अपयशाचं खापर फक्त मुख्यमंत्र्यांवर फोडण्याचा डाव, फडणवीसांचा गंभीर आरोप
कोरोना लॉकडाऊनंतरचं आयुष्य पूर्वीसारखं असेल? काय वाटतं तुम्हाला?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.