Home /News /career /

Career After 12th: बारावीनंतर ग्रॅज्युएशन कोर्सला प्रवेश घेताय? जरा थांबा.. आधी 'या' IMP गोष्टी वाचा

Career After 12th: बारावीनंतर ग्रॅज्युएशन कोर्सला प्रवेश घेताय? जरा थांबा.. आधी 'या' IMP गोष्टी वाचा

 विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतःला तयार करणं आवश्यक

विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतःला तयार करणं आवश्यक

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी (Factor to be consider before take admission in graduation) सांगणार आहोत ज्या कोणत्याही ग्रॅज्युएशन कोर्स करण्याआधी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं आवश्यक

    मुंबई, 09 जून:  MH BOARD 12TH RESULT महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल (Maharashtra State Board 12th Result 2022) काल दुपारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल तब्बल नव्वद टक्क्यांच्या वर लागला. निकालात मुलींनी बाजी मारली तर सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला. हजारो विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्यावर घेऊन मिळाले. निकाल तर लागला पण आता पुढे काय? चांगल्या कॉलेजमध्ये (How to get admission in good college after 12th) प्रवेश मिळेल का? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येऊ लागले आहेत. मात्र कोणत्याही क्षेत्रातील ग्रॅज्युएशन कोर्स (Graduation course after 12th) करण्याआधी विद्यार्थ्यांना त्यासाठी स्वतःला तयार करणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी (Factor to be consider before take admission in graduation) सांगणार आहोत ज्या कोणत्याही ग्रॅज्युएशन कोर्स करण्याआधी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आवडीचा कोर्स निवडणं आवश्यक कोणत्याही UG कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांची ताकद, कमकुवतता आणि इच्छा ओळखणे आवश्यक आहे. हे त्यांना त्यांच्या आवडीचा अभ्यासक्रम शॉर्टलिस्ट करण्यात मदत करेल. विद्यार्थ्यांना विषय निवडताना अनेक बाबी लक्षात ठेवाव्या लागतात. यामध्ये त्यांची त्या विषयाची आवड, त्या विषयाची व्याप्ती आणि त्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या अभ्यासक्रमाची पायाभूत सुविधा विकसित केली आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. MH BOARD 12TH RESULT: बारावीचे पेपर्स Re-checking ला द्यायचे आहेत? मग किती लागेल फी? जाणून घ्या ड्रीम कॉलेजेस निवडणे विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचा विषय निवडल्यानंतर, दुसरी गोष्ट म्हणजे महाविद्यालये किंवा विद्यापीठांची शॉर्टलिस्ट करणे. विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण घ्यायचे आहे ते कॉलेजेस निवडणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कोणतेही आंतरराष्ट्रीय महाविद्यालय किंवा विद्यापीठ निवडण्याचा पर्याय आहे. संस्थेच्या निवडीदरम्यान, विद्यार्थ्यांना किमान 4 संभाव्य महाविद्यालये निवडण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून ते कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील. म्हणूनच विद्यार्थ्यांना त्यांचे ड्रीम कॉलेजेस निवडणं आवश्यक आहे. सुटीच्या काळात सर्व कॉलेजेसची माहिती मिळवणं विद्यार्थ्यांसाठी अशक्य नाही. क्या बात है! IISC नं केली कमाल; World University Rankings मध्ये IIT 's ला मागे सारत मिळवली जागा प्रवेश परीक्षांची तयारी आवश्यक भारतातील बहुतेक महाविद्यालये १२वीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देतात. म्हणूनच, महाविद्यालयांनी जारी केलेले कट-ऑफ लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमात आणि महाविद्यालयात प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या 12वी वर्गासाठी चांगली तयारी केली पाहिजे. अशी काही विद्यापीठे आहेत जी यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी संशोधन करून या प्रवेश परीक्षांची संपूर्ण माहिती गोळा करणे आवश्यक आहे. सुटीच्या काळात प्रवेश परीक्षांची तयारी करणे आवश्यक आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career, Career opportunities, Exam result, HSC

    पुढील बातम्या