मराठी बातम्या /बातम्या /करिअर /बारावीत नापास झाले तरीही आज आहेत IAS IPS अधिकारी

बारावीत नापास झाले तरीही आज आहेत IAS IPS अधिकारी

12th Result

12th Result

सध्या सर्वत्र एकच धाकधूक सुरु असून सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं आहे. ते म्हणजे बारावी बोर्डाचा निकाल. त्यामुळे काहीजण आनंदी दिसत आहे तर काहीजण टेंशनमध्ये.

नवी दिल्ली, 25 मे : सध्या सर्वत्र एकच धाकधूक सुरु असून सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं आहे. ते म्हणजे बारावी बोर्डाचा निकाल. त्यामुळे काहीजण आनंदी दिसत आहे तर काहीजण टेंशनमध्ये. आज अखेर विद्यार्थ्यांचे निकाल समोर येणार असून सर्व निकालाची प्रतिक्षा करत आहे. दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. एक छोटासा निकाल आपल्याला खूप आनंद देऊ शकतो तर आपला आनंद हिरावूनही घेऊ शकतो.

निकाल कमी आला तरी खचून जाण्याचं कारण नाही. भीतीनंतर विजय असतो त्यामुळे संकटांना सामोरं जा. विद्यार्थी निकालात कमी आले म्हणजे पुढे आयुष्यातही ते कमीच असतील असं समजू नये. ते पुढच्या वर्गात किंवा पुढे जॉबमध्ये चांगलं यश मिळवतील. त्यामुळे पालकांनी आणि नातेवाईकांनी फक्त बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांवर नाराज होऊ नये. अशी अनेक उदाहरणं आहेत जे विद्यार्थी निकालात अयशसस्वी झाले आहेत ते आज आयएएस आयपीएस अधिकारी आहेत. तर काही चांगल्या पोस्टवर रुजू आहेत. त्यामुळे फक्त बारावीच्या किंवा शालेय जीवनातल्या कुठल्याही कमी निकालावरुन खचून जाऊ नका.

हेही वाचा -  Maharashtra Board 12th Result Declared: निकालात कोणत्या विभागानं मारली बाजी; इथे बघा विभागनिहाय रिझल्ट

चला, देशातील अशाच काही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेऊ जे कधी नापास झाले, पण त्यांनी हार मानली नाही. आयुष्याचे ध्येय निश्चित केले आणि अशा प्रवासाला निघाले. जिथे फक्त यशाने त्यांचा हात धरला आणि पायांनी शिखरावर नेले.

गौरव अग्रवाल आयआयटी कानपूरमध्ये शिकत होते. ते त्याच्या पदवीमध्ये नापास झाले. आणखी एक वर्ष अभ्यास करायचा होता, पण त्याने हार मानली नाही. यूपीएससीची परीक्षा दिली आणि आज ते आयपीएस आहेत.

उमेश कुमार अभ्यासात चांगले होते, पण जेव्हा 12वीचा निकाल हातात आला तेव्हा ते घाबरले. त्यांना वाटले की जगण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, पण तसे नव्हते, त्याच्या कुटुंबाने त्याला साथ दिली, त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि आज ते IAS आहे.

हेही वाचा -   Maharashtra Board HSC Result 2023 : बारावीच्या निकालात मुंबईकर ठरले 'ढ', विभागाचा धक्कादायक निकाल

रुक्मणी नायर 6वी मध्ये नापास झाल्या. पण त्यांनी यूपीएससीमध्ये टॉप केला. व्ही नंदकुमारम यांची कहानी कठीण आहे, त्यांना शाळा सोडावी लागली. ते अभ्यासात चांगले होते, त्यांनी हार मानली नाही आणि अखेर आज ते इन्कम टॅक्समध्ये उपायुक्त आहेत. अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे फक्त कमी निकालामुळे, नापास झाल्यामुळे खचून न जाता पुढच्या संकटांना सामोरं जा. अधिक मेहनत घेत स्वतःवर विश्वात ठेवत पुढची लढाई जिंका.

दरम्यान, कलाकार, अधिकारी, क्रिकेटर, असे सर्वच त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी फेल झाले आहेत. तरीही त्यांनी मेहनत आणि जिद्द न सोडता स्वतःला सिद्ध केलं आणि आज ते चांगल्या पदावर चांगल्या पगाराची नोकरी करतात. आयुष्य एकदाच येते आणि संधी पुन्हा पुन्हा येतात. आपण परीक्षेत नापास होऊ शकतो, पण जीवनाच्या परीक्षेसाठी नेहमी तयार राहा. या काळात पालकांनी मुलांना साथ देण्याची गरज आहे.

First published:
top videos

    Tags: Career, CBSE 12th, HSC Result, Maharashtra Board Exam, Maharashtra News