मुंबई, 25 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. नऊ विभागीय मंडळातील 14 लाख 16 हजार 372 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नऊ विभागात पुन्हा कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल 88.13 टक्के इतका मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबई विभागात मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.06 टक्के इतकी आहे तर मुलींची टक्केवारी 90.42 इतकी आहे. एकूण 3 लाख 29 हजार 337 विद्यार्थी विभागातून परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2 लाख 90 हजार 258 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. Maharashtra Board 12th Result 2023: राज्याचा एकूण निकाल इतके टक्के; जाणून घ्या निकालाची काही मोठी वैशिष्ट्ये बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल 93.73 टक्के इतका निकाल लागला आहे. तर मुलांचा निकाल 89.14 टक्के इतका आहे. मुलींच्या निकालापेक्षा मुलांच्या निकालाची टक्केवारी 4.59 टक्के जास्त आहे.
अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी 2.97 टक्क्यांनी घसरली. गेल्यावर्षी 94.22 टक्के निकाल लागला होता. यावर्षी मात्र 12 वीच्या निकालाचा हाच टक्का 91.25 टक्के इतका घसरलाय. विभागवार बारावीचा निकाल कोकण 96.01 टक्के पुणे 93.34 टक्के कोल्हापूर 93.28 टक्के, अमरावती 92.75 टक्के औरंगाबाद 91.85 टक्के नाशिक 91.66 टक्के लातूर 90.36 टक्के नागपूर 90.35 टक्के मुंबई 88.13 टक्के