मुंबई, 23 जुलै: मुलगी ही आई-वडिलांसाठी जबाबदारी आणि ओझं असलेल्या काळात नातेवाईकांचा विरोध पत्करुन गगन भरारी घेणाऱ्या एका यशस्वी वैमानिक महिलेची यशोगाथा आणि त्यांचा संघर्ष जाणून घेणार आहोत. आतापर्यंत UPSC आणि IAS अधिकाऱ्यांच्या यशोगाथा पाहिल्या मात्र रुढी-पंरपरांना छेद देत या महिलेनं गगन भरारी घेतली. या वाटचालीमध्ये कोणत्या समस्या आल्या आणि त्यावर कशी मात केली हे जाणून घ्यायचं आहे. वैमानिक रितू राठी-तनेजा या सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह असतात. रितू ते वैमानिक रितू होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मुलीला शिकवण्यापेक्षा तिचं लग्न करून द्या हे सांगणारे नातेवाईक असतानाही सगळ्यांचा विरोध पत्करुन आई-वडिलांनी रितू यांना मोठ्या कष्टानं शालेय शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही. शक्य होईल ते प्रयत्न करून त्यांनी शिक्षणात कसर पडणार नाही याची खबरदारी घेतली. शाळेत त्यांना मित्र-मैत्रीणींनी वैमानिक होण्याबाबत उल्लेख केला आणि त्यावेळी रितू यांनी आकाशात उंच भरारी घेण्याचा निश्चय मनाशी पक्का केला. आपण अशा समाजात राहातो जिथे आपल्याला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आधी घरापासून ते समजापर्यंत असा संघर्ष करावा लागतो असं रितो तनेजा यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. हे वाचा- Success Story: चहा विकणाऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी रितू यांच्या लग्नासाठी साठवलेले पैसे त्यांनी वडिलांकडून मागून घेतले आणि आपलं वैमानिकाचं पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांनी अमेरिकेत फॉर्म भरला. ‘अमेरिकेतून दीड महिन्यांचं ट्रेनिंग घेऊन आल्यावर भारतात सुरुवातील कुठेच नोकरी मिळेना. ब्रेन हॅमरेजमुळे आईचं निधन झालं. त्यावेळी माझ्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर होता. त्यावेळी नातेवाईकांनीही मदत करण्याऐवजी टोमणे मारून वडिलांना सुनवलं. मुलगी ओझं आहे तिची योग्य वेळी पाठवणी केली असती तर आज ही वेळ आली नसती. ’ हे वाचा- उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS त्यावेळी घरची परिस्थिती पाहून मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पार्ट टाइम नोकरी करून 7 तास अभ्यास करायचे. त्याचवेळी एका एअऱलाइन कंपनीतून मला वैमानिकाची ऑफर मिळाली. 4 वर्षांच्या प्रवासात मला 60 वेळा वैमानिक म्हणून स्वत: विमान हाताळण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी कॅप्टनपदावर आले. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. लग्न करून हुंडा देण्याऐवजी मला शिकवलेल्याचा माझ्या वडिलांना आजही गर्व आहे. वडिलांवरचं सर्व कर्ज मी या नोकरीतून फेडलं आजही माझ्या वडिलांना माझा अभिमान आहे असं रितू यांनी आपला अनुभव सांगितला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.