मुंबई, 19 एप्रिल : भारतीय तरुण गुगलवर अनेक प्रकारच्या गोष्टी शोधतात. यामध्ये सरकारी नोकर्या वरचेवर राहतात. दरवर्षी लाखो तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करतात. यासाठी तो गुगलचीही मदत घेतो. पण आता चॅटजीपीटीही त्यांच्या मदतीला धावून आली आहे. ChatGPT हे एआय टूल आहे. यातून तुम्ही कोणताही प्रश्न विचाराल, तर ते तुम्हाला त्याचे उत्तर देईल. कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असलेल्या ChatGPT ला कोणीतरी सरकारी नोकरीची तयारी कशी करायची हे विचारले. तुम्हाला जाणून थोडं आश्चर्य वाटेल, पण ChatGPT नेही उत्तर दिलं आहे. परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम जाणून घ्या सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. सर्व प्रथम परीक्षा, त्यांचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम यांची माहिती गोळा करा. याद्वारे तुम्हाला मार्किंग स्कीम आणि महत्त्वाच्या विषयांची माहिती मिळेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकाल. एअर फोर्समधील पायलटला नक्की किती मिळतो पगार? कशी असते सिलेक्शन प्रोसेस? इथे मिळेल A-Z माहिती वेळेचे व्यवस्थापन आणि योग्य नियोजन आवश्यक आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे. तुमच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार दररोज अभ्यास करा. तुम्ही ग्रुप स्टडी देखील करू शकता. यासह, अनेक लोक एकत्रितपणे सर्वोत्तम नोट्स तयार करू शकतात. 1-2 नाही तर देशातील ‘या’ विद्यापीठात तब्बल 700 जागांसाठी भरतीची घोषणा; तुम्ही आहात का पात्र? करा अप्लाय मॉक टेस्ट पॅटर्न क्लिअर करेल जर तुम्ही UPSC परीक्षेची तयारी करत असाल तर नक्कीच त्याच्या मॉक टेस्टला (UPSC Mock Test) उपस्थित राहा. यामुळे परीक्षेचा पॅटर्न आणि मार्किंग स्कीम समजून घेणे सोपे जाते. कधीकधी मॉक टेस्ट दिल्याने तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची संधी मिळते. ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी गुन्हेगारांच्या अंगाचा उडतो थरकाप; कोण आहेत या ‘मर्दानी लेडी सुपरकॉप’? मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पहा गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा जरूर अभ्यास करा. याद्वारे परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घेणे सोपे जाईल. उजळणीच्या टप्प्यात गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा. अनेकवेळा प्रश्नाची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता असते. आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री करा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन; ऑफिसच्या पहिल्याच दिवशी सर्वांना इम्प्रेस करायचंय? मग ‘हे’ नियम पाळाच आता स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे स्वरूप बदलले आहे. पूर्वीचे उमेदवार वाचनालयात बसून तयारी करत असत. पण आता ते पुस्तके तसेच अॅप्स, ऑनलाइन सराव चाचण्या, व्हिडिओ क्लास इत्यादींद्वारे त्यांची तयारी सुधारू शकतात.
सरावावर पूर्ण लक्ष द्या स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी नियमित सराव करणे आवश्यक आहे. यासाठी दररोज काही तास निश्चित करा. तुम्ही जे वाचता ते उजळणी करा. त्यामुळे मनामध्ये गोष्टी बसतील.